काळ्या रंगाचा आखुड ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूर...

काळ्या रंगाचा आखुड ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी विचारले, ‘हा स्लीपवेअर आहे की मग पँट घालायला विसरलीस?’ (Janhvi Kapoor Gets Brutally Trolled For Her Little Black Dress, Netizens Call it ‘Ye Sleepwear Hai Ya Phir Pant Pahnna Bhul Gai Kya?)

सुपरिचीत स्टारकिड जान्हवी कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईलबाबत आपल्या चाहत्यांना नेहमी काही ना काही टीप्स देत असते. परंतु यावेळी मात्र तिची स्टाईल आणि फॅशन तिलाच भारी पडली आहे. अलीकडेच जान्हवीला एका रेस्टॉरंटच्या बाहेर काळ्या रंगाच्या थिन स्ट्रैप आणि हाई स्लिट शॉर्ट ड्रेसमध्ये पाहण्यात आले. नेटकऱ्यांनी तिचा हा अवतार पाहताच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असते. ती जेव्हा जेव्हा आउटिंग, जिम वा डिनरसाठी बाहेर पडते, तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो आणि व्हिडिओज लगेचच व्हायरल होतात.

https://www.instagram.com/reel/CdtSgRWq5Kp/?utm_source=ig_web_button_share_sheet

अलिकडेच जान्हवी आपली बेस्ट फ्रेंड शनाया कपूर आणि अनन्या पांडेसोबत डिनरला एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. हा फोटो तेव्हाचाच आहे. या फोटोंमध्ये जान्हवी सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे.

जान्हवीने काळ्या रंगाचा, डीप नेक अन्‌ साइड कट असलेला आखुड ड्रेस घातला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत आणि स्लिंग बॅग घेतली आहे. पायातही काळ्या रंगाच्या मॅचिंग हिल्स घातल्या आहेत. जान्हवी या पेहरावामध्ये सुंदर दिसत असली तरी नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

ड्रेसची लेस पाहून नेटकरी, जान्हवीने नायटी वा स्लीपवेअर का घातला आहे? असे विचारले आहे. तर ड्रेसचा आखुडपणा पाहून कोणी तिला तू खाली स्कर्ट वा पँट घालायला विसरलीस का असंही विचारलं आहे. जान्हवीला तिच्या ड्रेसिंगवरून ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. ती जेव्हा स्काय ब्ल्यू कलरचा जंपसूट घालून दिसली होती, तेव्हाही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.

(व्हिडिओ सौजन्य  – विरल भयानी)