बॅकलेस जंपसूट घालून डिनरला निघालेल्या जान्हवी क...

बॅकलेस जंपसूट घालून डिनरला निघालेल्या जान्हवी कपूरवर ट्रोलर्सची बोचरी टीका (Janhvi Kapoor Gets Brutally Trolled For Her Backless Jumpsuit, Trolls Say, Sasti Kylie Jenner)

मुंबईत आपल्या मित्रमंडळींसोबत डिनरसाठी गेली असताना जान्हवी कपूरचा हॉट लूक मीडियाने कॅमेऱ्यात कैद केला. जान्हवीसोबत अनन्या पांडेही दिसत होती. परंतु जान्हवीने घातलेल्या आउटफिटमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या. तिने स्काय ब्ल्यू कलरचा बॅकलेस जंपसूट घातला होता, जो लोकांना फारसा पसंत पडला नाही.

जान्हवीचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बोचऱ्या शब्दांत तिची टीका केली आहे. एका युजरने तिला स्वस्तातली काईली जेनर असं म्हटलं. काईली ही अमेरिकन मॉडेल आणि सेलिब्रिटी आहे, जी तिच्या हॉटनेसमुळे सगळ्यांची चहेती आहे. परंतु जान्हवीचा पेहराव पाहिल्यानंतर काईलीची ती निकृष्ट दर्जाची प्रतिकृती असल्याचे त्याने म्हटलं आहे.

 

काहींनी तिला उर्फी जावेदही म्हटले आहे. काहींनी असं म्हटलंय की, आता श्रीदेवी (जान्हवी कपूरची आई) असती, तर आपल्या मुलीला पाहून नाखूश झाली असती. काहींनी तिला बोल्ड कपडे वापरू नको, नीटनेटके कपडे वापर, असा सल्लाही दिला आहे.

खरं म्हणजे जान्हवीने घातलेले कपडे अतिशय पातळ आणि अंगाबरोबर होते. त्यामुळे ते त्वचेला चिकटल्यासारखे दिसत होते, तर दुसरीकडे तो सूट हवेशीरही होता. म्हणूनच तो ड्रेस चाहत्यांच्या नजरेला खटकला.

दुसरीकडे काही जण जान्हवीची प्रशंसाही करत आहेत. स्मोकी मेकअप आणि केसांच्या स्टाईलमुळे ती किलर दिसत आहे असेही काही जण म्हणत आहेत. यावेळी अनन्या पांडे मात्र साध्या कॅज्युअल कपड्यांत दिसली. तिने व्हाइट रिप्ड जिन्स आणि व्हाइट क्रॉप टॉप घातला होता. काहींनी जान्हवी सोबत तिचीही प्रशंसा केली. डिनरसाठी असेच जायला हवे, असे त्यांनी म्हटले.