जान्हवी कपूरने केले बॅकलेस होऊन प्रमोशन (Janhvi...

जान्हवी कपूरने केले बॅकलेस होऊन प्रमोशन (Janhvi Kapoor Flaunts Her Sexy Back In Backless Top And Pink Pant Before Roohi Film Release.)

सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जान्हवी कपूरने चक्क बॅकलेस टॉप घालून आपल्या ‘रूही’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीचा आरंभ केला आहे. पिंक पॅन्ट आणि बॅकलेस टॉप घालून तिने आकर्षक पोझेस दिल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये पॉप्युलर स्टार किड असा जान्हवीचा बोलबाला आहे. ‘रुही’चे प्रदर्शन जवळ येऊ लागले आहे, तशी तिने आपली ग्लॅमरस छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसारित केली आहेत.

या छायाचित्रांमध्ये ती सिक्वीन टॉप, पिंक पॅन्ट आणि स्लीक हेअर स्टाईलमध्ये अल्ट्रा ग्लॅमरस दिसते आहे.

‘रूही’ चित्रपटासाठी जान्हवीने ग्लॅमरचा ट्विस्ट दिला आहे.

मॉडर्न कपडे घालून जान्हवीने सोशल मीडियावर आपले फोटो प्रसारित केले. ते करताना तिने कॅप्शन लिहिली – पलट? # रूही डे २.

आपली सेक्सी पाठ तिने उघडी टाकली…

‘रूही’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना जान्हवीने बॅकलेस टॉप घातला व आपली सेक्सी पाठ उघडी टाकली. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले हे फोटो पाहून तिचे फॅन्स फिदा झालेत.

कपड्यांबरोबरच तिची स्टाईलपण कमालीची आहे…

बॅकलेस टॉप आणि पिंक पॅन्ट सोबत जान्हवीने मॅचिंग हुप इअरिंग्ज्‌ घातलेत आणि बोटांमध्ये अंगठ्यादेखील घातल्या. केसांचे मधोमध पार्टिंग करून हाय स्लीक पोनीटेल बनविले आहेत.

मेकअप्‌मध्ये न्यूड लिपस्टीक, लाइट पिंक रुज आणि पर्पल ग्लिटरींग आयलायनर लावून तिने आपले रूप खुलविले आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जान्हवीबरोबर वरूण शर्मा आहे.

‘रूही’ हा चित्रपट हॉरर कॉमेडी असल्याचं सांगितलं जातं. त्यामध्ये जान्हवी, राजकुमार राव आणि वरुण शर्मा या दोघांची नायिका म्हणून दिसेल. ११ मार्चला हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्याची तयारी चालू आहे.

‘गुड लक’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले सत्र जान्हवीने पूर्ण केले आहे. ‘कोलामावु कोकिला’ या तामिळ चित्रपटांवरून हा ‘गुड लक’ बेतण्यात आला आहे. ‘गुंजन सक्सेना’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात जान्हवी अलिकडेच दिसली होती.