ओम शांती ओम चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिम...

ओम शांती ओम चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जान्हवी कपूरने चित्रपटातील एक सीन मजेशीरित्या केला रिक्रेएट (Janhvi Kapoor celebrates 15 years of Om Shanti Om by recreating Deepika Padukon’s scene, See Funny Video)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिली’ या चित्रपटातील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक मजेदार रील शेअर केली आहे. या रीलमध्ये जान्हवीने ओम शांती ओम फेम अभिनेत्री दीपिका पादुकोणचा चित्रपटातील  एक सीन पुन्हा तयार केला आहे.

व्हिडिओत जान्हवीने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. एका मोठ्या झुंबराखाली उभं राहून जान्हवीने हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी म्हणते- ‘शांतीचा मृतदेह या झुंबराखाली, या झुंबराखाली सापडेल’. यानंतर लगेच कॅमेरा बंद होतो. झुंबराखाली जमिनीवर पडलेला जान्हवीचा मित्र अभिनेत्रीचे डायलॉग ऐकून हसतो.

कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आणि आज 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी फराह खानला शुभेच्छा दिल्या. तिकडे अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी फराह खानला शुभेच्छा दिल्या. याच निमित्त अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच तिचा मिली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बोनी कपूर यांनी दिग्दर्शित केले होते. हा मल्याळम चित्रपट हेलनचा रिमेक आहे.