आलिया भट्टसाठी जान्हवी कपूर कोणत्याही थराला जाऊ...

आलिया भट्टसाठी जान्हवी कपूर कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण ऐकून व्हाल थक्क (Janhvi Kapoor can go to Any Extent for Alia Bhatt, You Will be Shocked to Know the Reason)

बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलिया भट्टच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे, त्यामध्ये सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश होतो. या यादीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुलीचे नाव देखील समाविष्ट आहे. अल्पावधीतच बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी तरुण अभिनेत्री जान्हवी कपूर ही आलिया भट्टची खूप मोठी फॅन आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री आलिया भट्टसाठी काहीही करायला तयार असते. त्यामागे कारणही तसेच खास आहे.

जान्हवी कपूर केवळ आलिया भट्टची फॅन नाही, तर ती अनेकदा तिला टेक्स्ट मेसेजही पाठवते. जान्हवीने स्वतः एकदा सांगितले होते की ती आलियासोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि आलियासोबत काम करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.

एका मुलाखतीत जान्हवी कपूरने सांगितले होते की, मी आलियाची सर्वात मोठी फॅन आहे आणि तिच्यासोबत काम करण्यासाठी मला कोणाचा जीव घ्यावा लागला तरी मी मागे हटणार नाही.

जान्हवी म्हणाली की, मी आलियाला ज्या प्रकारचे मेसेज पाठवते, जर कोणी ते पाहिले तर त्यांना वाटेल की आमच्यामध्ये काही समस्या आहे, परंतु आलिया भट्टला माझ्या संदेशांबद्दल असे काहीही वाटत नाही. आलियाला धोकादायक मेसेज पाठवणाऱ्या जान्हवीने तर असंही म्हटलं होतं की, आता मला भीती वाटत आहे की आलिया माझ्यावर गुन्हा दाखल करेल.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘मिली’ चित्रपटात दिसली होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. अभिनेत्रीकडे भरपूर काम असून ती लवकरच तिच्या आगामी दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे, सध्या त्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे.

दुसरीकडे, आलिया भट्टबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने काही काळापूर्वी मुलगी राहाला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मापासून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलिया लवकरच ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे.