जान्हवी कपूर एक्स बॉयफ्रेंडलाच पुन्हा करतेय डेट...

जान्हवी कपूर एक्स बॉयफ्रेंडलाच पुन्हा करतेय डेट? चर्चांवर सोडलं मौन (Janhvi Kapoor breaks silence about rumoured boyfriend Orhan Awatramani )

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुनही काही दिवसांपासून चर्चेत होती. बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांदरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूर ही ओरहान अवत्रमणीसोबत एकत्र पाहायला मिळाली. हे दोघं एकेकाळी एकमेकांना डेट करायचे असं म्हटलं जायचं. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांचं पॅचअप झाल्याचं कळतंय. ओरहान आणि जान्हवी यांचं खरंच अफेअर आहे का, यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने ओरहानविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जान्हवी आणि ओरहानला बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलंय. जान्हवीने हॅलोवीन पार्टीलासुद्धा त्याच्यासोबत हजेरी लावली होती. दोघं एकत्र विविध देशांमध्ये फिरायलासुद्धा गेले होते. सोशल मीडियावरही दोघं एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसतात.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने ओरहान विषयीच्या तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जान्हवीला ओरहानबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, ‘मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो एकाप्रकारे माझी सपोर्ट सिस्टीम आहे. त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. मीसुद्धा नेहमीच त्याच्यासोबत असते. तो जेव्हा सोबत असतो, तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि मी त्याच्यावर खूप विश्वास करते. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. असा मित्र भेटणं खूप भाग्याची गोष्ट आहे. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो खूप चांगला मित्र आहे.’

फक्त जान्हवीच नाही तर सारा अलीखान, अनन्या पांडे, शनाया कपूर, इब्राहिम खान, न्यासा यांचाही तो खूप चांगला मित्र आहे. स्टारकिड्ससोबत नेहमीच वावरत असलेल्या ओरहानने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावरही त्याचे खूप फॉलोअर्स आहेत.

ओरहान हा पेशाने प्रशिक्षित अॅनिमेटर आहे. सारा अली खान त्याची क्लासमेट होती. ग्रॅज्युएशन पार्टीतील या दोघांचा एकत्र फोटोसुद्धा आहे. अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासाचाही तो खास मित्र आहे.