जान्हवी कपूरने घेतलं ६५ कोटी रुपये किंमतीचं घर ...

जान्हवी कपूरने घेतलं ६५ कोटी रुपये किंमतीचं घर : या आलिशान घरात आहे बगीचा आणि स्विमींग पूल (Janhvi Kapoor Bought A Duplex For 65 Crores, The Luxurious House Has Open Garden And Swimming Pool)

चित्रसृष्टीत प्रवेश करून जान्हवी कपूरला फक्त ५ वर्षे झालीत. एवढ्या कमी काळात तिच्या यशाची कमान सतत चढती राहिली आहे. ‘मिली’ या नव्या चित्रपटामुळे जान्हवी सध्या चर्चेत आहे. पण आता आणखी एका गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे. तिने मुंबईतील वांद्रे विभागात एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेन्ट विकत घेतलं आहे. ऐकिवात असं आहे की, या आलिशान घराची किंमत ६५ कोटी रुपये आहे. एका वृत्तानुसार असंही कळतं की, जान्हवीने हे घर आपली बहीण खुशी कपूर आणि वडील बोनी कपूर यांच्यासोबत घेतलं आहे.

या आलिशान घराचा कार्पेट एरिया ६,४२१ चौरस फूट आहे. प्रती चौरस फूट किंमत काय द्यावी लागली असेल, याचा विचार केला तर ती १ लाख रुपये येते. जान्हवीच्या या घराची माहिती रिअल इस्टेट पोर्टल वर उपलब्ध असलेल्या कागदपत्रात देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर घराचा सौदा झाल्यानंतर जान्हवीने १२ ऑक्टोबर रोजी त्याचे रजिस्ट्रेशन केले आहे. त्यासाठी ३.९० कोटी रुपये अशी भलीमोठी रक्कम तिने स्टॅम्प ड्युटीच्या स्वरुपात भरली आहे.

जान्हवीच्या मालकीच्या या अपार्टमेन्टमध्ये ५ मोटारगाड्यांची पार्किंग जागा मिळाली आहे. घर पहिला व दुसरा माळा जोडून आहे. पहिल्या मजल्यावर स्विमींग पूल आणि ओपन गार्डन एरिया आहे. वांद्रे येथील ज्या पाली हिल परिसरात जान्हवीने हे घर घेतले आहे, ती श्रीमंतांची वस्ती आहे.

गेल्या जुलै महिन्यात आपले सुमारे साडे तीन हजार चौरस फुटांचे एक घर जान्हवीने राजकुमार रावला विकले होते. त्यापोटी तिला ४४ कोटी रुपये मिळाल्याचे समजते.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)