जान्हवी कपूरचा ड्रेस इतका महागडा, की त्या पैशात...

जान्हवी कपूरचा ड्रेस इतका महागडा, की त्या पैशात आपली मालदीवची ट्रिप होईल (Janhavi’s Dress Is So Costly That We Can Travel Maldives With The Money)

जान्हवी कपूर आपल्या ‘रूही’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गर्क आहे. त्यासाठी ती अतिशय महागडे ड्रेस घालते आहे. नुकताच तिने काळ्या रंगाचा स्लीवलेस गाऊन घातला होता. त्याला पुढच्या बाजूस स्लीट आहे. त्यातून तिचे सुबक पाय दिसतात.

Photo Courtesy: Instagram (All Photos)

जान्हवीने घातलेला हा काळा गाऊन तिच्या गौर वर्णावर अतिशय खुलून दिसतो आहे. त्याला पुढच्या बाजूस छातीवर खडे आणि चांदीच्या चकत्या लावल्या असून त्यामुळे या ड्रेसची शोभा अतिशय वाढलेली आहे. सदर गाऊन अतिशय महागडा आहे. लंडनच्या डेव्हिड कोमाच्या डिझायनर स्टोअरमधून तो तिने विकत घेतला आहे. हा गाऊन जवळपास दीड ते दोन लाख रुपये किंमतीचा आहे. (भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत)
या गाऊनच्या किंमतीत आपण मालदीव बेटांवर ३ रात्री व ४ दिवसांचे पॅकेज घेऊन आरामात राहू शकतो. अर्थात ही किंमत मध्यम दर्जाच्या रिसॉर्टमध्ये राहण्याची आहे. लंडनच्या ज्या स्टोअरमधून जान्हवीने हा गाऊन घेतला आहे, त्या स्टोअरमधून हॉलिवूडच्या गाजलेल्या अभिनेत्री आपले ड्रेसेस घेतात. जान्हवीच्या या ड्रेसची व एकूणच तिच्या ड्रेस स्टाईलची बॉलिवूडमध्ये चर्चा होत असून तिला आपली आई श्रीदेवी हिचा ड्रेस सेन्स असल्याचे बोलले जाते.
जान्हवीचा ‘रूही’ हा आगामी चित्रपट हॉरर कॉमेडी असून त्याची पार्श्वभूमी हिमाचल प्रदेश आहे. जान्हवीसोबत राजकुमार राव व वरुण शर्मा असे दोन नायक त्यात आहेत.