जान्हवी कपूरला तिच्या आई-वडिलांचा खूपच अभिमान व...

जान्हवी कपूरला तिच्या आई-वडिलांचा खूपच अभिमान वाटतो….(Janhavi Kapoor Feels Proud About Her Parents)

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मोठी लेक अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तिच्या करीअर संबंधी काही गोष्टींचा खुलासा केला. तिच्या करिअरच्या सुरुवातीला ती आयत्या बिळावर नागोबा आहे असे टोमेणे लोक मारायचे. लोकांच्या मते मला सगळे आयते एका ताटात मिळाले जे खरेतर तिच्या हक्काचे ही नव्हते असे अनेकांनी म्हटले.

मुलाखतीत जान्हवी म्हणाली, माझ्या ध़डक आणि गुंजन या चित्रपटांदरम्यान अनेकजणांनी मला जे काही मिळाले आहे एकत्रच एका ताटात आयते मिळाले आहे. त्या गोष्टींसाठी मुळात मी पात्र नाही. माझे स्वत:चे असे काहीच नाही. माझ्या आईवडिलांनी जे काम केले त्यामुळे मी हे दिवस पाहत आहे असे अनेकांचे म्हणणे होते.

खरेतर जेव्हा लोक माझ्या आईवडिलांचा उल्लेख करुन म्हणायचे तेव्हा मला माझ्या आईवडिलांबद्दल खूप आदर वाटायचा आणि खूप अभिमान वाटायचा की मला त्यांच्यामुळे काम मिळाले. पण खरेतर मला अभिनय खूप आवडतो आणि मी त्याचसाठी जगते.

गुड लक जेरीबद्दल जान्हवीने सांगितले की या चित्रपटासाठी माझ्या उच्चारांवर आणि भाषेवर ट्रेनिंग घेतले. बिहारी भाषा ही खूप गोड आहे. त्या भाषेची एक विशिष्ट लय आहे. एकदा का तुम्ही ती लय पकडली की मग तुम्ही त्यातून बाहेर पडणे मुश्किल होऊन जाते. या चित्रपटात मी एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे.