‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये जयदीपचा वेगळा...

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये जयदीपचा वेगळा अंदाज (Jaideep To Appear In A Differently New Look In Marathi Serial ‘Sukh Mhanje Nakki Kay Aste’)

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीची भेट तर झालीय. पण ज्या शालिनीमुळे जयदीप-गौरीला एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं तिला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित देण्यासाठी जयदीप वेष पालटून शिर्केपाटलांच्या घरात दाखल होणार आहे. यासाठी जयदीपने वृद्धाचं रुप धारण केलं असून तो लक्ष्मी इण्डस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचं भासवणार आहे.

खरंतर शालिनीने चिमुकल्या लक्ष्मीला जीवे मारण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला. लेकीच्या प्रेमापोटी जयदीपला शिर्केपाटलांच्या घरापासून दूर राहावं लागलं. गौरीपासूनही तो दुरावला. मात्र आता जयदीप गौरी एकत्र आलेत. आपल्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीला दिलेल्या त्रासाचा बदला जयदीपला घ्यायचा आहे. यासाठीच त्याने नवं रुप धारण केलं आहे.

शालिनी पैशांची लोभी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. लक्ष्मी इण्डस्ट्रीजचा मालक घरी आलाय म्हटल्यावर त्याच्या पैश्यांवरही शालिनीचा डोळा आहे. पैसे मिळवण्यासाठी ती काहीही करु शकते. त्यामुळे जयवंत देशमुख हा नवा अवतार धारण केलेल्या जयदीपच्या तालावर शालिनी कशी नाचणार हे पाहाणं उत्सुकतेचं असेल.