मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश...

मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांचा रोमँटिक फोटो होतोय व्हायरल (Jacqueline Fernandez`s romantic selfie with conman Sukesh Chandrasekhar sparks controversy)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की, जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता, जॅकलिनचा सुकेशसोबतचा एक फोटो समोर आल्यामुळे ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरु असताना जॅकलीन आणि सुकेश यांचा एक फोटो समोर आला आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब ही आहे की, हा फोटो सुकेश जामिनावर तिहारमधून बाहेर आला तेव्हाचा आहे. जामीन मिळाल्यानंतर तो चेन्नईला गेला होता. आणि जॅकलीन तिला भेटायला चैनईला गेली होती. सध्या व्हायरल होणारा फोटो देखील चैन्नईमधील एका हॉटेलमधील आहे.

फोटोमध्ये सुकेशच्या हातात फोन दिसत आहे. या फोनमध्येच इस्रायलचे सीम कार्ड टाकून २०० कोटी वसूल केले होते. सुकेशला जामीन मंजुर झाल्यानंतरही तो हा फोन वापरत होता. पण या फोटोमध्ये जॅकलिन असल्यामुळे सध्या चर्चेत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची तिला कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.