जॅकलीन फर्नांडिसला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि ९ ल...

जॅकलीन फर्नांडिसला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि ९ लाखांची मांजर, अशा अजब गिफ्ट्स देणारा महाठग (Jacqueline Fernandez Was Gifted Rs 52 Lakh Horse & Rs 9 Lakh Cat By Conman Sukesh Chandrashekhar)

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल होताच मोठे खुलासे होत आहेत. तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये महान ठग सुकेश चंद्रशेखरबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालया (ED) कडून ७००० पानांचे आरोपत्रदाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. त्यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही बोललं जात आहे.

Jacqueline Fernandez, Horse, Cat, Sukesh Chandrashekhar

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा अन्‌ ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे. तेव्हा नोराने आपली बाजू मांडताना सांगितले होते की ती कोणत्याही प्रकारच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सामील नाही, परंतु ती स्वतः याची बळी आहे आणि ईडीला पूर्ण सहकार्य करेल. ईडीही नोराकडे साक्षीदार म्हणून पाहत आहे.

Jacqueline Fernandez, Horse, Cat, Sukesh Chandrashekhar

जॅकलीनबद्दल सांगायचे तर, काही दिवसांपूर्वी तिचा सुकेशसोबतचा एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सुकेश आणि जॅकलीन आरशातील सेल्फीमध्ये एकमेकांजवळ आलेले दिसत होते. सुकेश जॅकलिनच्या गालावर चुंबन घेताना दिसला होता आणि एक-दोन छायाचित्रेही समोर आली होती ज्यात जॅकलीन सुकेशच्या गालावर किस करताना दिसत आहे. यानंतरच दोघांमधील नात्याचे प्रकरण समोर आले.

Jacqueline Fernandez, Horse, Cat, Sukesh Chandrashekhar

मात्र, जॅकलिनने सुकेशसोबतचे कोणतेही संबंध नाकारले होते. सुकेशवर देशभरात करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. असे सांगितले जात आहे की, सुकेश जामिनावर बाहेर असताना जॅकलीन आणि त्याची अनेकदा भेट झाली होती आणि दोघांनीही हॉटेलमध्ये वेळ घालवला होता. तिहार जेल प्रकरण समोर आल्यानंतरच जॅकलिनचे नाव समोर आले होते.