जॅकलिनला करायचे होते सुकेशसोबत लग्न, तोच होता त...

जॅकलिनला करायचे होते सुकेशसोबत लग्न, तोच होता तिच्या स्वप्नातला राजकुमार (Jacqueline Fernandez Wanted To Marry Conman Sukesh Chandrasekhar, Actress Called Him ‘The Man Of Her Dreams’)

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची अडचण दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे प्रेमसंबंध होते. अभिनेत्रीची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांशिवाय ती ईडीच्याही रडारवर आहे. सुकेशच्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलीनचा थेट सहभाग नसला तरी तिने सुकेशने फसवून घेतलेल्या पैशातून खूप महागड्या भेटवस्तू घेतल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्याच्याबद्दल सर्व काही माहित असूनही तिने तसे केल्यामुऴे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आता पुन्हा एकदा जॅकलिनबद्दल नव्याने माहिती समोर आली आहे. अभिनेत्री सुकेशसोबत लग्न करण्याच्या तयारीत होती. तो अगदी तिच्या स्वप्नांचा राजकुमार झाला होता आणि ती त्याला तिचा ड्रिम मॅन म्हणायची. जॅकलिनला सुकेशचे वेड लागले होते. बुधवारी जॅकलिनची ईओडब्ल्यूकडून 8 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. पोलिसांचे म्हणणे आहे की जॅकलीन सुकेशच्या प्रेमात इतकी वाहवत गेली होती की, त्याचे गुन्हे समोर येऊनही ती त्याच्या संपर्कात राहिली. यामुळे ती भविष्यात वाईटरित्या अडकू शकते.

पोलिसांचे म्हणणे आहे की, जेव्हा नोराला सुकेशचे सत्य समजले तेव्हा तिने स्वतःला त्याच्यापासून दूर केले. दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेने जॅकलिनचे मॅनेजर प्रशांतकडून एक डुकाटी सुपरबाइकही जप्त केली आहे, त्या बाईकची किंमत सुमारे 8 लाख आहे. ही बाईक सुकेशने प्रशांतला भेट म्हणून दिली होती. सुकेश सध्या तुरुंगात आहे. जॅकलीन आणि नोरासोबत सुकेशकडून भेटवस्तू घेणाऱ्यांमध्ये निक्की तांबोळीच्या नावाचाही समावेश आहे. बिग बॉस फेम निक्कीला सुकेशने लाखोंच्या महागड्या ब्रँडची पर्स गिफ्ट केली होती, असे म्हटले जाते.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही नोराची चौकशी केली तेव्हा नोराला भेट म्हणून मिळालेली महागडी कार सुकेशच्या पत्नीने एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोराला भेट म्हणून दिल्याचे समोर आले आहे.