पैशांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून ‘ईडी&...

पैशांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने केली जॅकलीन फर्नांडिसची चौकशी (Jacqueline Fernandez Questioned By ED In Money Laundering Case)

देखणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, पैशांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून आता अडचणीत आली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) तिची कित्येक तास कसून चौकशी केली. माहितगारांकडून असे कळते की, कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर याच्याशी हे प्रकरण जोडले गेले आहे. ज्याचे नाव मनी लॉन्डरिन्ग अर्थात्‌ पैशांच्या अफरातफरीवरून प्रथम उघडकीस आले होते.

Jacqueline Fernandez, ED In Money Laundering Case

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे की, पैशांच्या अफरातफरीवरून जॅकलीन फर्नांडिसची ईडीने कसून तपासणी केली.

Jacqueline Fernandez, ED In Money Laundering Case

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जॅकलीनने आपल्या बँक खात्यामधून सुमारे दीड कोटी रुपयांच्या परदेशी चलनाची उलाढाल केली, असं या संदर्भात कळलं आहे. हा व्यवहार तिने सरकारी यंत्रणेपासून छपवून केला. त्यामुळे ती ईडीच्या चौकशी फेऱ्यात आली. स्वतः जॅकलीनने अद्याप याबाबत काही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Jacqueline Fernandez, ED In Money Laundering Case

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या संदर्भात सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे जॅकलीन फर्नांडिस अलिकडेच एका आलिशान घरात राहायला गेली. हे घर प्रियंका चोप्राचे होते. या घराचे प्रदर्शन तिने आपल्या अधिकृत चॅनलवरून केले. आधी ती भाड्याच्या घरात राहत होती. पण ज्या नव्या, आलिशान घरात आता ती राहायला गेली आहे; त्याची किंमत ७ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

Jacqueline Fernandez, ED In Money Laundering Case

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जॅकलीनच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर सध्या ती ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. यामध्ये तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम हे कलाकार आहेत. याशिवाय जॅकलीन रणवीर सिंह सोबत ‘सर्कस’, जॉन अब्राहम सोबत ‘अटॅक’, अक्षयकुमार सोबत ‘बच्चन पोंडे’ व ‘रामसेतु’ अशा चित्रपटांमधून दिसणार आहे.