प्रेमात पडलेल्या जॅकलीन फर्नांडिसचे पाय जमिनीवर...

प्रेमात पडलेल्या जॅकलीन फर्नांडिसचे पाय जमिनीवर पडत नाहीयेत (Jacqueline Fernandez in love with south based businessman)

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही तिच्या खाजगी जीवनाबद्दल त्वचितच बोलताना दिसते. त्यामुळेच आत्तापर्यंत ते फारसं चर्चिलं गेलेलं नाही. परंतु सध्या जॅकलीनला तिचं प्रेमाचं माणूस सापडलं असल्यामुळे तिचं खाजगी आयुष्य बऱ्यापैकी चर्चिलं जात आहे.

अजूनपर्यंत या विषयाबाबत मौन पाळलेल्या जॅकलीनचं हे गुपित उघड झालं आहे. खबरबात अशी आहे की, बऱ्याच काळापासून ती रिलेशनशिपमध्ये आहे. आपला जोडीदार म्हणू्न बॉलिवूडमधील अभिनेत्याची निवड न करता, साऊथमधील एका बिझनेसमॅनला जॅकलिन डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. एवढंच नाही तर त्या दोघांनी लवकरच एकाच छताखाली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

जॅकलीनने मुंबईतील जुहू परिसरामध्ये घर विकत घेतले असून लवकरच ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत नव्या घरात जाण्याची तयारी करत आहे. सांगायचं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून जॅकलीन मुंबईच्या बांद्रा आणि जुहू परिसरामध्ये घर शोधत होती, पण त्यावेळेस जॅकलिन आपल्या प्रेमासाठी आशियाना धुंडाळत होती, याची कोणाला काय कल्पना असणार? लवकरच ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत येथे शिफ्ट होऊ शकते. तेथेच ते दोघे लिव्ह इन मध्ये राहणार आहेत.

जागा खरेदीसाठीची टोकन अमाऊंट जॅकलीनने दिली आहे. फक्त फायनल पेपर वर्क बाकी आहे. तिने जुहूला सी फेस बंगला घेतला आहे. याची किंमत १७५ कोटी असल्याचे बोलले जात आहे. घरातील प्रत्येक कोपरा न्‌ कोपरा ती स्वतःच्या कल्पनेतील रंगांनी सजवणार आहे. त्यासाठी तिने फ्रान्स बेस्ड एका इंटियिअर डिझायनरकडे घराच्या सजावटीचं काम सोपवलं आहे.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे प्रेमी युगुल सतत व्हिडिओ कॉल करून एकमेकांशी कनेक्टेड असतात. घरासंबंधीचे सगळे सोपस्कार पूर्ण होत असतानाच्या काळातही जॅकलीनचा बॉयफ्रेंड व्हिडिओ कॉलवर हजर असायचा, असं म्हटलं जातंय.

जॅकलीनच्या या ब्रॉयफ्रेंडबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही. शिवाय जॅकलीनने देखील त्यांच्यातील नातं अजूनपर्यंत कन्फर्म केलेलं नाही आहे. परंतु खबर अशी आहे की, सध्या या अभिनेत्रीचे पाय जमिनीवर पडत नाहीयेत. प्रेमात पडल्यामुळे तर ती आनंदी आहेच शिवाय तिच्याकडे राम सेतु, बच्चन पांडे, भूत पुलिस आणि सर्कस यांसारखे अनेक मोठे सिनेमे आहेत, त्यामुळे तिचे करिअर देखील चांगलेच चालले आहे.