जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या : आर्थिक गैर...

जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ तिला आरोपी ठरविण्याची शक्यता (Jacqueline Fernandes Is In Big Trouble : She Is Likely To Be Convicted Alongwith Sukesh Chandrashekhar)

अंमलबजावणी संचालनालयाने कथित आरोपी सुकेश चंद्रशेखर व अन्य काही लोकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सुकेशची जीवलग मैत्रिण म्हणून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची अनेकदा चौकशी ‘ईडी’ने केली आहे.

सुकेश चंद्रशेखरने खंडणी व इतर गुन्हे करून जॅकलीन फर्नांडिसला सुमारे ५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या भेटवस्तू दिल्या असल्याचे या चौकशीतून समोर आले आहे. या भेटवस्तूंव्यतिरिक्त चंद्रशेखरने तिच्या जवळच्या नातेवाईकांना १ लाख ७२ हजारांहून अधिक रक्कम (सुमारे १ कोटी ३० लाख रुपये) दिल्याचेही सांगण्यात येते.

‘ईडी’ने केलेल्या आरोपानुसार जॅकलीन वर ही मेहेरबानी करण्यासाठी अवैधरित्या गोळा केलेला पैसा वापरला आहे. त्यामुळे सदर विभागाने जॅकलीन भोवती चौकशीचा फास आवळला असून तिच्यावर लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता वाढली आहे. त्यातून तिला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“या कठीण व आव्हानात्मक प्रसंगाला मी खंबीरपणे सामोरी जाणार आहे. सर्व काही ठीक होईल. आपले उद्दीष्ट आणि स्वप्ने खरी करण्याइतकी मी सामर्थ्यवान आहे”, अशी प्रतिक्रिया जॅकलीनने या संदर्भात इन्स्टाग्रामवर व्यक्त केली आहे.