परिणीती चोप्राने, अर्जुन कपूरला सणसणीत थोबाडीत ...

परिणीती चोप्राने, अर्जुन कपूरला सणसणीत थोबाडीत मारली… का? ऐका त्याच्याच तोंडून… (I’ve Been Slapped Yet Again By Parineeti Chopra, Says Actor Arjun Kapoor)

”परिणीती चोप्राने पुन्हा एकदा माझ्या सणसणीत थोबाडीत मारली” – हे वक्तव्य अर्जुन कपूरने केलं. अन्‌ ते आगीसारखं वेगानं पसरलं… कारण काय? ते ऐकायला सगळेच उत्सुक आहेत…
अर्जुन व परिणीती ‘इश्कजादे’ या चित्रपटात प्रथमच एकत्र दिसले होते. २०१२ साली हा चित्रपट आला होता. आता ‘संदीप और पिंकी फरार में’ हा नवा चित्रपट येऊ घातलाय्‌. त्यात परिणीतीने अर्जुनच्या सणसणीत थोबाडीत मारली आहे. असाच प्रसंग ‘इश्कजादे’ मध्ये पण चित्रित झाला होता. याच कारणाने अर्जुन सांगत सुटलाय्‌ की परिणीतीने पुन्हा माझे थोबाड रंगवले…

महिलांवर होणारा हिंसाचार ही या चित्रपटाची कथावस्तू आहे. ”हा अतिशय गंभीर विषय आहे. जेव्हा आपण एखादी व्यक्तीरेखा साकार करतो, तेव्हा आपल्याला खासगी जीवनाच्या बाहेर यावं लागतं. तेव्हाच आपण त्या व्यक्तीरेखेशी समरस होऊ शकतो. कारण समाजात अशीही माणसे असतात, असा विश्वास प्रेक्षकांच्या मनात निर्माण करायचा असतो.” असे अर्जुन सांगतो.

”या चित्रपटाच्या संदर्भात बोलायचं तर परिणीतीने मला थोबाडीत मारली, ती व्यक्तीरेखेला अनुसरून आहे. कथानक मी वाचले आहे. त्याच्या मागणीनुसार हे चित्रण झालं आहे. मी एखाद्या स्त्रीवर हात उचलणार का? असा प्रश्न निर्माण होतो. पण अशी भूमिका करणारच नाही.”

दिबाकर बॅनर्जीचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट १९ मार्चला सिनेमाघरात प्रदर्शित होईल.

‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय्‌ आपली रडकथा!’