इमरान हाशमीचा विक्रम मोडणारा, आमीर खान हाच चुंब...

इमरान हाशमीचा विक्रम मोडणारा, आमीर खान हाच चुंबनसम्राट (Its Not Emraan Hashmi, But Aamir Khan Is ‘The King of Lip-Locks’: Mr Perfectionist Has Kissed 14 Actresses So Far)

इमरान हाशमी या नटाला बॉलिवूडचा सिरियल किसर – अर्थात चुंबनाधिकारी म्हटलं जातं. कारण त्यानं रुपेरी पडद्यावर त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक नटीचा किस घेतला आहे. पण खरं म्हटलं तर ही उपाधी इमरानपेक्षा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला अधिक लागू पडते. कारण त्याने आतापावेतो एक-दोन नव्हे तर तब्बल १३ नट्यांची चित्रपटात चुंबने घेतली आहेत. तेव्हा आमीरला चुंबनसम्राट म्हणायला हरकत नाही.

पहिल्याच चित्रपटात किट्टू गिडवाणीचे घेतले चुंबन

‘होली’ या आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातच आमीर खानने या चुंबन मालिकेची सुरुवात केली. १९८४ साली आलेल्या या चित्रपटात आमीरने किट्टू गिडवाणीचे चुंबन घेतले होते.

जुही चावलाचा घेतला पॅशनेट किस

‘कयामत से कयामत तक’ हा आमीरची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट, त्याचा पहिला मानला जातो. या प्रणयप्रधान चित्रपटाने आमीरचे चाहते वाढले. त्यामध्ये आमीरने जुही चावलाचे अगदी आवेगाने चुंबन घेतले होते.

माधुरीच्या चुंबनाने प्रेक्षकांच्या दिलाची धडकन वाढली

१९९० साली आलेला ‘दिल’ हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. यामध्ये आमीर व माधुरी दिक्षित यांच्यावर चित्रित केलेले चुंबनदृश्य अतिशय गाजले होते. त्या प्रसंगात दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय भावली होती.

पूजा बेदीचे घेतले चुंबन

‘जो जीता वोही सिकंदर’ हाही आमीर खान अभिनीत चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यात आमीरने पूजा बेदीचे चुंबन घेतले.

राणी मुखर्जीचे पण घेतले चुंबन

राणी मुखर्जी ही देखील आमीरच्या चुंबनाची भागीदार ठरली आहे. ‘गुलाम’ या चित्रपटात आमीरने तिचे छानपैकी चुंबन घेतले होते.

सोनाली बेंद्रेचे आठवणीतले चुंबन

‘सरफरोश’ या चित्रपटात आमीरने, सोनाली बेंद्रेचे घेतलेले चुंबन प्रेक्षकांच्या चांगलेच आठवणीत आहे.

मनीषाचे बाथ टबमध्ये चुंबन

१९९५ साली प्रदर्शित झालेला आमीरचा ‘अकेले हम अकेले तुम’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये त्याची नायिका होती मनीषा कोईराला. या चित्रपटात बाथ टबमध्ये आमीर-मनीषावर चुंबन दृश्य चित्रित करण्यात आले होते.

फ्लॉप चित्रपटाचा हिट सीन

‘मेला’ हा आमीरच्या कारकिर्दीतला फ्लॉप चित्रपट समजला जातो. पण त्यामध्ये चित्रित करण्यात आलेले ट्विंकल खन्ना सोबतचे प्रेमदृश्य व चुंबनदृश्य मात्र गाजले. प्रेक्षकांना ते खूप आवडले.

ममताचे घेतलेले चुंबन आठवतेय्‌ का?

एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या ममता कुलकर्णी सोबत देखील आमीर खानने चुंबनदृश्य दिले आहे. ‘बाजी’ या चित्रपटात आमीर-ममताचे हे दृश्य बरेच गाजले होते.

करिश्मा कपूरचे प्रदीर्घ चुंबन

‘राजा हिंदुस्तानी’ हा आमीर व करिश्मा कपूर या जोडीचा चित्रपट खूप हिट झाला होता. त्यामध्ये या दोघांवर जे चुंबनदृश्य चित्रित करण्यात आलं, ते खूपच चर्चेत आलं होतं. सर्वाधिक लांबीचं हे प्रदीर्घ चुंबन घेण्याचा विक्रम आमीरच्या खाती जमा झाला आहे. जवळपास ४० सेकंद आमीर व करिश्मा यांच्यामधील हे प्रदीर्घ चुंबन आहे.

जुहीसोबत अनेकदा चुंबाचुंबी

आमीर खान व जुही यांचा ‘इश्क’ हा रोमॅन्टिक चित्रपट खूपच हिट झाला होता. त्यामध्ये आमीरने तिचे करकचून चुंबन घेतले होते. खरं तर दोघांनी यापूर्वी पडद्यावर चुंबनदृश्ये दिली होती. पण या दृश्याने प्रेक्षक चांगेलच चकित झाले होते.

‘रंग दे बसंती’ मध्ये चुंबनदृश्य

आमीर खान अभिनीत ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट परदेशातही चालला होता. ॲलिस पॅटन या परकीय अभिनेत्रीशी देखील आमीर खानने चुंबनदृश्य दिले आहे.

‘३ इडियटस्‌’ चे क्लायमॅक्स चुंबन

आमीर खान व करीना कपूरची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘३ इडियटस्‌’ शिवाय ते दोघे ‘तलाश’मध्ये दिसले होते. अन्‌ आता ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट येऊ घातला आहे. ‘३ इडियट्‌स’ हा चित्रपट वेगळे कथानकाबाबत गाजला तसेच त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या संदर्भातही गाजला. तरीपण या चित्रपटातील करीनाने त्याचे क्लायमॅक्स प्रसंगात आवेगाने घेतलेले चुंबन देखील लक्षवेधी ठरले. लग्नप्रसंगातून करीना पळून जाते व आमीरला भेटते. अन्‌ त्याचे आवेगाने चुंबन घेते, असे हे चुंबनदृश्य होते.

किसिंग सीनने केली धूम

‘धूम ३’ या गाजलेल्या चित्रपटात आमीर खानने ग्लॅमरस आणि हॉट समजल्या जाणाऱ्या कतरीना कैफला देखील सोडले नाही. या चित्रपटातील दोघांच्या चुंबनदृश्याने चांगलीच धूम मचवली होती.