‘पृथ्वीराज’ सिनेमातील पोशाख बनविण्यासाठी २ वर्ष...

‘पृथ्वीराज’ सिनेमातील पोशाख बनविण्यासाठी २ वर्षं लागली, तेव्हा कुठे बनले ५० हजार पोशाख आणि ६०० पगड्या (It Tooks So Many Years Of Hard Work To Make Prithviraj’s Costume, Then Only 50,000 Costumes And 600 Turbans Were Made)

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉलिवूडच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक आहे. याचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्वीवेदी यांनी केले आहे. या बिग बजेट चित्रपटाचा सेट, ड्रेस, ज्वेलरी हे सगळं खूप भव्य आहे, अन्‌ या सगळ्यासाठी किती मेहनत आणि किती पैसा खर्च झाला आहे हे जाणून तुम्ही थक्क व्हाल.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

पृथ्वीराज चित्रपटातील अक्षय आणि मानुषीच्या लूकसाठी चित्रपट निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे. यांना पडद्यावर राजा – राणीसारखे दिसण्यासाठी जवळपास दोन वर्षांच्या मेहनतीनंतर यश मिळाले. चित्रपटाच्या टीमने देशातील अनेक शहरात फिरून ६ महिने संशोधन केले. जेणेकरून चित्रपटातील पात्रे अगदी खरी वाटतील. रॉयल लुकसाठी बाडमेर, जैसलमेर, नागौर ते कोटा अशा अनेक ठिकाणी फिरून कपडे बनवण्यात आले. दागिन्यांसाठीचा शोध जयपूर आणि बिकानेरमध्ये पूर्ण झाला. यासाठी हजारो कारागीरांची मेहनत आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ग्लॅमर वर्ल्डचा डिझायनर नाही तर राजस्थानच्या धौलपूर येथील संजीव राज परमारने अक्षयला हुबेहुब पृथ्वीराजचा लूक देण्याची जबाबदारी घेतली होती. या चित्रपटासाठी त्यांनी ६०० प्रकारच्या पगड्या आणि ५० हजार पोशाख डिझाइन केले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. इतकंच नाही तर दागिने आणि कपड्यांसोबतच त्यांनी चित्रपटात वापरण्यात आलेल्या पादत्राणांपासून ते पर्सपर्यंतची रचनाही केली आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

पृथ्वीराजचा सेट बनविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे. ‘पृथ्वीराज’मध्ये दिल्ली, अजमेर आणि कन्नौज ही शहरे १२व्या शतकातील असल्याप्रमाणे पुन्हा तयार करण्यात आली, ज्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सेट-डिझाइन करण्यासाठी १०० – २०० नव्हे तर तब्बल ९०० कारागिरांनी सुमारे आठ महिने मेहनत घेतली आहे. चित्रपटात दाखविलेल्या अनेक शहरांसाठी खऱ्या संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सेट वास्तव दिसत आहे.

पृथ्वीराजांच्या काळातील राजवाड्यापासून ते दरबार बनवण्यापर्यंत निर्मात्यांना ३५ कोटी रुपये खर्च करावे लागले. हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने तेच वातावरण राखण्यासाठी सेटवर ३०० ते ४०० कनिष्ठ कलाकारांची फौज सैनिक म्हणून उपस्थित असायची. सोशल मीडियावर चित्रपटाचा असा भव्य दिव्य फर्स्ट लूक समोर आल्यावर चाहत्यांनी चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

या चित्रपटामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त संजय दत्त, सोनू सूद, मानुषी छिल्लर, मानव विज आणि साक्षी तन्वर यांसारखे कलाकारही आहेत.