काजोलची विचित्र फॅशन पाहून लोकांनी केली टीका : ...

काजोलची विचित्र फॅशन पाहून लोकांनी केली टीका : म्हणाले, हिला उर्फी जावेदची बिमारी लागली काय? ( Ise Bhi Urfi Wali Bimari To Nahi Lag Gai… Kajol Gets Brutally Trolled For Her Recent Look)

काजोल सगळ्यांनाच आवडते. तिची तऱ्हाच काही वेगळी आहे, कारण तिच्या साधेपणातही कमालीचं ग्लॅमर दिसून येतं. बहुतांशी चाहत्यांना तिला साडीतच पाहायला आवडतं, पण अलीकडे काजोलने अल्ट्रा मॉडर्न ड्रेस परिधान केला होता. एका अवॉर्ड फंक्शनसाठी काजोलने हा ब्लॅक अँड व्हाइट गाऊन घातला होता. ज्यामध्ये एक मोठी कॉलर नेक लाईनपासून सुरू झाली होती आणि गळ्याला गुंडाळत होती. काजोलने त्याच्यासोबत न्यूड लिप कलर आणि चमकदार आय शॅडो लावला होता.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले आहे – हॅपी हॅलोवीन विचेस… काजोल या अतिशय स्टायलिश आणि मॉडर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. परंतु चाहत्यांना तिची ही विचित्र फॅशन आवडली नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले.

कोणीतरी लिहिले – ‘अजय देवगण सकाळी उठून विचारेल की घराचे पडदे कुठे गेले…’ एकाने लिहिले की, ‘हे बाईकच्या कव्हरसारखं दिसतंय’, कोणाला तरी काजोल या ड्रेसमध्ये इतकी अस्वस्थ वाटली, त्यांनी असं म्हटलंय की,’तू साडीत खूप सुंदर दिसतेस, मग असा ड्रेस का घातला आहेस, आता पडशील असे वाटते…’ एवढंच नाही तर लोकांनी तिच्या स्टाइलची तुलना उर्फी जावेदशी केली असून हिला उर्फीची बिमारी लागली की काय…? असं विचारलं आहे.

तथापि, अनेक चाहत्यांना तिचा हा लूक देखील आवडला आहे आणि ते तिला स्टनर, स्टायलिश, देवी, अद्वितीय आणि सुंदर अशा कमेंट्‌स देत आहेत. एवढेच नाही तर लोक, तिने आपल्या मित्राला अर्थात शाहरूखला त्याच्या वाईट काळात साथ दिली नाही असं म्हणूनही ट्रोल करत आहेत. याउलट, जुही चावला आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी गेली आणि तिने ती त्याची खरी मैत्रिण असल्याचं सिद्ध केलं.