प्रभास करत आहे बॉलिवूड अभिनेत्रीला डेट ? एकेकाळ...

प्रभास करत आहे बॉलिवूड अभिनेत्रीला डेट ? एकेकाळी अनुष्का शेट्टीसोबत जोडले होते नाव (Is South Superstar Prabhas Dating This Bollywood Actress? His Name Was Once Associated With Anushka Shetty)

‘बाहुबली’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा साऊथचा सुपरस्टार प्रभास अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला आहे. प्रेक्षकांमध्ये प्रभासची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास आपल्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. पण याहून महत्वाचे म्हणजे त्याचे नाव बॉलिवूडमधील एका सुंदर अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. या दोघांच्या अफेअरच्या बातम्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहेत. एकेकाळी अनुष्का शेट्टीला डेट करत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या प्रभासचे नाव सध्या बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडले जात आहे.

 बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती सेनन आजकाल चित्रपटांसोबतच तिच्या लव्ह लाईफमुळेसुद्धा खूप चर्चेत असते. साऊथचा सुपरस्टार प्रभास बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननला डेट करत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत. ‘कॉफी विथ करण’ या शोनंतर दोघांच्या डेटींगच्या बातम्यांना उधाण आले. क्रिती सेननने शोमधील कॉलिंग सेगमेंट दरम्यान प्रभासला कॉल केला होता, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभास आणि क्रिती सेनन यांच्यात मैत्रीपलिकडे काहीतरी असल्याची चर्चा आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते.’आदिपुरुष’ चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि एकत्र काम करताना त्यांच्यातील नाते खूपच घट्ट होत गेले.

त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत, कारण सुपरस्टार असूनही प्रभास लाजाळू आहे, तर याउलट क्रिती सेनन खूप फ्रेंडली आहे. पण प्रभास क्रितीसोबत असताना मात्र खूप खुलेपणाने बोलतो. त्यांच्या नात्याबद्दल इतक्या लवकर काहीही सांगणे घाईचे ठरेल, पण चित्रपट संपल्यानंतरही दोघांमधील चांगले बाँडिंग दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचे सांगण्यास पुरेसे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरही दोघांमध्ये एक खास बॉण्ड आहे. दोघेही अनेकदा एकमेकांना कॉल आणि मेसेज करतात, त्यावरून दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेमभावना आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण दोघेही आपल्या नात्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देत नाहीत. क्रितीच्या आधी प्रभासचे नाव अनुष्का शेट्टीसोबत जोडले गेले होते.

क्रिती सेनन आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट पुढील वर्षी 12 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन कलाकारांशिवाय सैफ अली खानही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभास आणि क्रिती सेननला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम