अवॉर्ड फंक्शनमध्ये कतरीना कैफचे वाढलेले पोट पाह...

अवॉर्ड फंक्शनमध्ये कतरीना कैफचे वाढलेले पोट पाहून युजर्स म्हणाले, गोड बातमी की देशी पदार्थांची कमाल… (Is Katrina Kaif Pregnant? Fans Ask As She Appears In Silver Sequin Body Hugging Gown In An Award Function)

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी उटी येथे आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी या जोडप्याने लग्न केले. आता त्यांच्याकडून आनंदाची बातमी कधी येईल याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधीही कतरीनाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या.  मात्र त्या केवळ अफवा ठरल्या आणि आता पुन्हा एकदा कॅट आणि विकी गोड बातमी देणार असल्याचं चाहत्यांना वाटतंय.

काल कॅट एका अवॉर्ड फंक्शनला गेली होती. तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती. कॅटने सिल्व्हर सीक्विंड बॉडी हगिंग गाउन घातला होता आणि गाऊनचे नूडल स्ट्रॅप तिच्या पोशाखाला सेक्सी लुक देत होता. कॅटचे ​​सरळ रेशमी केस, नैसर्गिक मेकअप आणि तिचे सुंदर स्मित हास्य तिला जबरदस्त लुक देत होते. ती खूप सुंदर दिसत होती. एकीकडे तिचे सौंदर्य पाहून अप्सरा उतरली आहे असे म्हणत होते, तर दुसरीकडे काहीजण तिचे वाढलेले वजन आणि वाढलेले पोट पाहून ती गरोदर असल्याचा अंदाज लावत होते.

कॅटचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर काहींनी म्हटले की, अभिनेत्रीचे वजन थोडे वाढले आहे, लग्नानंतर आणि वयानुसार शरीरात बदल होतो, याचा अर्थ ती गर्भवती आहे असे नाही. दुसरीकडे, इतर युजरचे म्हणणे आहे की हे वाढलेल्या वजनाचे पोट नाही हे नक्कीच बेबी बंप आहे. काही युजर्स याला देशी पदार्थांचा चमत्कार असेही म्हणत आहेत. काहींच्या मते, कॅट आता तूप आणि पराठे खात असेल, त्यामुळे तिचे वजन वाढत आहे.

कतरीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती एक था टायगर 3 मध्ये सलमानसोबत दिसणार आहे. तसेच प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा फोनभूत प्रदर्शित झाल होता. मात्र तो फ्लॉप झाला. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर होते.