१६ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीशी ह्रितिक रो...

१६ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीशी ह्रितिक रोशन डेटिंग करतोय का? (Is Hrithik Roshan Dating This Actress: Deets Inside About The Mystery Girl?)

आठवडा अखेरीस हृतिक रोशन अचानक चर्चेत आला. एका रेस्टॉरंट बाहेर, एका अज्ञात मुलीचा हात धरून येत असलेला लोकांनी त्याला पहिला. ही मुलगी कोण आहे नि हृतिक पुन्हा प्रेमात पडलाय की काय? असे प्रश्न लोकांना पडले आहेत.

नंतर उघडकीस आलं की ती, अभिनेत्री व वादक सबा आझाद आहे. ‘मुझसे फ्रेंडशिप में’ या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. अन वेब सिरीजमध्ये तिने काम केले आहे. हृतिक पेक्षा सबा  १६ वर्षांनी लहान आहे. तिने म्युझिक व्हिडीओ बनवला आहे. तिचा एक बॅन्ड होता. नासिरुद्दीन शहाच्या मुलासोबत तिने हा बॅन्ड सुरु केला होता. ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. पण तिची दखल घेतली नव्हती. आता ती ‘रॉकेट बॉईज’ सिरीजमध्ये दिसणार आहे.

सध्या सबा आपल्या खासगी जीवनाबाबत चर्चेत आहे. ती आणि हृतिक एकमेकांशी डेटिंग करत आहेत की काय, याबाबत लोक तर्क लढवू लागले आहेत.