एम्ब्रियो अ‍ॅडॉप्शन करावे का? (Is Embryo Adopti...

एम्ब्रियो अ‍ॅडॉप्शन करावे का? (Is Embryo Adoption Helpful To Conceive A Child?)

माझे वय 40 वर्षे आहे. आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. पण अजून आम्हाला मूल झालेलं नाही. सर्व तपासण्यानंतर आम्हाला ‘एम्ब्रियो अ‍ॅडॉप्शन’चा तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. ते करावे का?

 • सुचित्रा, पनवेल
  काही दाम्पत्यांमध्ये स्त्रीबीजे व शुक्रजंतू यांची संख्या अत्यंत कमी असते. कधी कधी यांची गुणवत्ता चांगली नसते. अशावेळी इतर स्त्रीचे स्त्रीबीज व इतर पुरुषाचे शुक्रजंतू यापासून तयार केलेला गर्भ स्वीकारण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. तेव्हा ते करावे. त्यामध्ये हा गर्भ इच्छुक स्त्रीच्या गर्भाशयात रोपित केला जातो.
 • माझे वय 42 वर्षे आहे. मला एम्ब्रियो अ‍ॅडॉप्शन करायचे आहे. पण डॉक्टरांनी एम्ब्रियो अ‍ॅडॉप्शनच्या आधी हिस्टरोस्कोपी करावयाचा सल्ला दिला आहे. ती करावी का?
 • क्षमा, मुंबई
  हिस्टरोस्कोपी मध्ये गर्भाशयाची पोकळी दुर्बिणीने तपासली जाते. एम्ब्रियो अ‍ॅडॉप्शनच्या आधी तुमचे गर्भाशय व्यवस्थित आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. तेव्हा ती देखील करून घ्या.
 • माझ्या बीजांडामध्ये 7 सेंटिमीटरची गाठ ‘सिस्ट’ झाली आहे. मी सध्या 3 महिन्यांची गर्भार आहे. ह्या सिस्टसाठी शस्त्रक्रिया करावी लागेल का?
 • लता, कोल्हापूर
  साधारणतः बीजांडामधील सिस्ट हे आपसूकच निघून जातात. जर ही गाठ 7 सेंटिमीटरची असेल तर ती स्वतःभोवती फिरू शकते. त्याला ‘टॉर्शन’ म्हणतात कधी ती फुटू शकते अथवा त्यात जंतुसंसर्ग होऊ शकतो. हे सर्व धोके लक्षात घेता जर ही गाठ आपसूक निघून गेली नाही तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. ही शस्त्रक्रिया गर्भारपणाच्या मधल्या 3 महिन्यात करावी.