दिशा पटणी आणि अलेक्झांडर अॅलेक्स यांच्यात नक्क...

दिशा पटणी आणि अलेक्झांडर अॅलेक्स यांच्यात नक्की काय आहे नाते? कोण आहे हा अलेक्झांडर अॅलेक्स… (Is Disha Patani Dating This Mystery Man? Know Who Is Alexander Alex)

अभिनय आणि सौंदर्यासोबतच आपल्या फिटनेससाठीही चर्चेत असलेली दिशा पटणी वैयक्तिक आयुष्यासाठीही सतत चर्चेत असते. दिशाचे रिलेशनशिप स्टेटस नेहमीचं चर्चेत असते. दिशा गेल्या काही वर्षांपासून टायगर श्रॉफला डेट करत असल्याचे बोलले जात होते. आणि आता तिचे व टायगरचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.ब्रेकअप कशामुळे झाले हे सांगता येत नसले तरी त्यांच्या ब्रेकअपची बातमी व्हायरल झाली होती. सध्या दिशा एका वेगळ्याच मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून दिशा पटणीचे एका हँडसम मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टायगरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा आता या व्यक्तीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. आता यात कितपत तथ्य आहे, हे सांगता येणार नाही, पण दोघेही एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल वाटतात.दिशा आपल्या आरोग्याबाबत आणि फिटनेसबाबत खूप जागरूक असते हे आता सर्वांना माहीत आहे. आजकाल ती ज्या मलासोबत दिसत आहे त्याचे नाव अलेक्झांडर अॅलेक्स अलिक आहे. तो फिटनेस ट्रेनर, मॉडेल आणि अभिनेता आहे. दिशा दररोज त्याच्यासोबत आपले फोटो शेअर करत असते. अलेक्झांडरने ‘गिरगिट’ नावाच्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तो टायगर श्रॉफचा चांगला मित्र असल्याचेही बोलले जाते.दिशाचे अलेक्झांडरसोबतचे फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे दिशा अलेक्झांडरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा तिचे चाहते करत आहेत. दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, येत्या काही दिवसांत ती प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत ‘सूर्या 42’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘योद्धा’मध्ये सुध्दा सिद्धार्थ मलमल्होत्रासोबत दिशा प्रमुख भूमिकेत दिसेल.