अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर या व्यक्तीला करत...

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर या व्यक्तीला करतेय डेट, मालदीव मधील बॉयफ्रेंडसोबतचे फोटो केले शेअर (Is Arjun Kapoor’s sister Anshula Kapoor dating script writer Rohan Thakker? Anshula drops heartwarming video with her ‘most favourite boy’)

बोनी कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर भलेही मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरी तिची फॅन फॉलोइंग इतर कलाकारांपेक्षा कमी नाही. ती शरीराची सकारात्मकता आणि प्रेरक पोस्ट शेअर करते, अंशुलाच्या पोस्ट खूप व्हायरल होतात.


बऱ्याच दिवसांपासून अंशुला आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. ती अनेकदा मुलींच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची झलक शेअर करते, जे पाहून चाहत्यांनाही फिटनेससाठी प्रेरणा मिळते.


सध्या अंशुला कपूर बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंशुला हिला सुध्दा तिचे खरे प्रेम मिळाल्याचे बोलले जाते. ती स्क्रिप्ट रायटर रोहन ठक्करला डेट करत आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर याबद्दलची हिंट दिली आहे.
अंशुला कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रोहन ठक्करसोबत मालदीवमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओद्वारे तिने रोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच त्याच्यासाठी एक खास नोटही लिहिली आहे, जे पाहून नेटकऱ्यांना ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची खात्री झाली आहे.


व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अंशुला रोहनसोबत मस्ती करत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू दिसत आहे. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये अंशुलाने लिहिले की, ‘माझ्या सगळ्यात आवडत्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याने माझे जग बदलले.’ अंशुलाच्या या पोस्टवर रोहननेही छान प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी अंशुलाने रोहनसोबत एक रील शेअर केली होती, त्यासाठी कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, “आनंद म्हणजे कॅरोसेल राईड with rohanthakkar1511… #WhyGrowUp #LondonDiaries”.
अंशुलाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अंशुलाच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि युजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली असून, तुम्ही एकमेकांना डेट करत आहेत का असा प्रश्न चाहते कमेंटमध्ये विचारत आहेत.