आरोग्यासाठी गुंतवणूक करा – ज्येष्ठ डॉक्टरांचा स...

आरोग्यासाठी गुंतवणूक करा – ज्येष्ठ डॉक्टरांचा सल्ला (Invest In Health Is The Need Of The Hour : Senior Doctor’s Sincere Advice)

“आपण मौजमजेसाठी हॉटेलिंग, बारसं-बारावं, पर्यटन अशा गोष्टींवर हजारो रुपये खर्च करतो. त्याऐवजी ही गुंतवणूक आरोग्य राखण्यासाठी करावी,” असा मोलाचा सल्ला डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, या ज्येष्ठ डॉक्टरांनी दिला. मुंबई येथील गोदरेज मेमोरियल हॉस्पिटलच्या हेल्थ जिनेमिटर स्मार्ट प्लॅन या अभिनव योजनेच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी, सदर योजनेवर एक परिसंवाद झाला. त्यात डॉ. कुलकर्णी यांच्यासह, डॉ. बोमन धाबर, डॉ. दीपक मोदी, डॉ. एल. सी. वर्मा आणि चित्रपट व टी.व्ही. कलाकार छवी मित्तल यांनी भाग घेतला. आपल्या देशातील ढासळत्या आरोग्याची आकडेवारी पाहता हृदयविकार ग्रस्तांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा आणि मधुमेह ग्रस्तांची संख्या जगातील इतर देशांपेक्षा अधिकच असल्याचे पाहणी अहवालात दिसून आले आहे. शिवाय कॅन्सर व इतर प्राणघातक रोगांनी ग्रासलेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. २५ ते ६० या वयोगटातील भारतीयांमध्ये हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा प्रादुर्भाव वाढलेला असून त्यामुळे आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया जातात. अन्‌ उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाने अर्थकारण बिघडते, ते वेगळेच.

या सर्वांवर मात करण्यासाठी सदर हेल्थ जिनोमिटर स्मार्ट प्लॅनची निर्मिती करण्यात आली असून ही बहुव्याप्ती योजना भारतात पहिली असल्याचा दावा या प्रसंगी डॉ. एल.सी.वर्मा यांनी केला. यामध्ये कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह यांच्यासह जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या सुमारे १५० रोगांचे निदान व उपाययोजना यांचा समावेश आहे. हेस्टॅक ॲनालिटिक्सने ही योजना विकसित केली असून त्याला आय. आय. टी. मुंबईने पाठबळ दिले आहे. तर गोदरेज मेमोरियल हॉस्पिटलतर्फे तो राबविण्यात येत आहे.

आपण स्वतः कॅन्सर वर मात केली असल्याचे बॉलिवूड अभिनेत्री व निर्माती छवी मित्तल, हिने मनमोकळेपणाने सांगितले. अन्‌ “या रोगाची शेवटपर्यंत वाट  बघू नका. त्याच्याकडे नकारात्मक बघू नका. तर सकारात्मक व आशादायी दृष्टीकोन ठेवा. आपल्या जीवनशैलीत बदल घडवा. आरोग्याची निगा सकारात्मक पद्धतीने राखा,” असा सल्ला तिने कॅन्सरग्रस्तांना नायरिका होळकर यांच्या हस्ते झाले.

(फोटो सौजन्य – फ्रीपिक)