लेडीज पॅन्टी आणि मजेदार किस्से (Interesting Myt...

लेडीज पॅन्टी आणि मजेदार किस्से (Interesting Myths Related To Ladies Panties)

महिलांचे अती आवश्यक अंतर्वस्त्र म्हणजे पॅन्टी… अर्थात् निकर आणि ग्रामीण भाषेत सांगायचं तर चड्डी… या पॅन्टीचे कितीतरी प्रकार सध्या उपलब्ध आहेत. खरं तर ही अंगाला तंग बसणारी, कोणाच्याही नजरेस न पडणारी वस्तू आहे. पण तिचे रंग, आकार, स्टाईल याबाबत महिलावर्ग कमालीचा चोखंदळ आहे… अशा या पॅन्टीशी निगडीत काही मजेदार किस्सेही आहेत.

–  आपल्या देशातील 60 टक्क्यांहून अधिक महिला ब्रॅन्डेड पॅन्टीज्, लॉन्जरीज्च्या बड्या दुकानातून खरेदी करण्यापेक्षा फूटपाथवरील विक्रेत्यांकडून घेणे पसंत करतात. रस्त्यावरील दुकानातील माल असली की नकली याबाबत त्या फार विचार करत नाहीत. घेतात मात्र तिथूनच. त्याप्रमाणे लॉन्जरीज्चा सेल असला की तिथे गर्दी करतात. अन् सेलमधील पॅन्टीज् घेणे अधिक पसंत करतात.
– आपल्या शेजारचा देश आहे म्यानमार. इथे एखाद्या बाईने पिवळ्या रंगाची पॅन्टी घातली म्हणजे तिने नवर्‍याशी काडीमोड घेतल्याचे प्रतीक असते. किंबहुना जिचा घटस्फोट होतो, ती पिवळ्या रंगाची पॅन्टी परिधान करते.

–  डच तरुण-तरुणींमध्ये डेटिंग फार जोरात चालते. त्यांचे ब्रेक-अप देखील तसेच फटाफट होतात. एखाद्या तरुणीला किंवा बाईला, आपल्या प्रियकराचा कंटाळा आला की, ती त्याला निळ्या रंगाची पॅन्टी पाठवते. त्याचा अर्थ ’तू तुझा दुसरा रस्ता पकड बेट्या. मला आता दुसराच कुणी भेटलाय… गुड बाय.’ म्हणजे आपल्या प्रेयसीकडून निळ्या निकरची भेट आली की, त्या बिचार्‍या प्रेमवीराने ’देवदास’ व्हावे किंवा ’तू नही और सही’ म्हणत दुसर्‍या प्रेयसीच्या नादी लागावे, हे ठरलेले असते.

–   आग्नेय दिशेकडील काही देशात लेडीज् पॅन्टी जवळ बाळगणं ’लकी’ मानलं जातं. म्हणजे आपली बायको अथवा प्रेयसी हिची पॅन्टी खिशात किंवा बॅगेत टाकून गेलं की, काम होतं, ही समजूत आहे.
–  ब्राझील देशातील गावाकडच्या महिला पॅन्टी घालतच नाहीत. आपल्या लैंगिक स्वातंत्र्याची ही पॅन्टी शत्रू आहे, अशी त्यांची समजूत आहे. त्यामुळे या दुश्मनाला त्या आपल्या अंगी लावून घेत नाहीत.

–  जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि मानवी स्वभावांचे अभ्यासक कार्ल गुस्ताव यांच्याकडे एक रुग्ण आला. अन् त्याने आपल्याला निद्रानाश झाला असल्याचे सांगितले. तो रोग इतका जबरी होता की, रात्र-रात्र त्याचा डोळ्याला डोळा लागत नसे. त्याचा पूर्वेतिहास जाणून घेत गुस्ताव यांनी त्याला सल्ला दिला की, तुझ्या प्रेयसीची निकर जवळ घेऊन झोप, तुझी समस्या दूर होईल… अहो आश्चर्यम्, त्या रुग्णाने हा प्रयोग करताच त्याचा निद्रानाश दूर झाला.

–  फिनलॅन्डमध्ये जेव्हा एखादी स्त्री पांढरी पॅन्टी घालते तेव्हा असं समजलं जातं की, ती सेक्स करण्यास राजी नाही. ज्या दिवशी ती गडद रंगाची पॅन्टी घालेल, त्यावेळी तिची सेक्स करण्याची तयारी आहे, असा संकेत असतो. अन् तिनं निळी किंवा जांभळी निकर घातली तर तिला विचित्र प्रकारे सेक्स करायचा आहे, असे संकेत असतात. आपले हे असे संकेत ती कसे दाखवते, ते त्या फिनलॅन्डच्या महिलाच जाणोत.
–   काही देशात सुगंधित पॅन्टीज् विकल्या जातात. या सुगंधित पॅन्टीज्ची कल्पना एका लॉन्जरीच्या कारखान्यातील महिलांनीच अमलात आणली आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक रोमॅन्टिक असतात, असं मानायला जागा आहे.

–   अमेरिकेच्या कित्येक परगण्यात महिलांची ब्रा आणि पॅन्टी यांचे प्रदर्शन करण्यास सक्त मनाई आहे. अगदी खिडकीबाहेर किंवा गॅलरीतील दांडीवर देखील ही अंतर्वस्त्रे सुकविण्यासाठी देखील दिसता कामा नयेत, असा आदेश आहे.
–  सौदी अरेबियामध्ये लॉन्जरीच्या दुकानात पुरुषांना प्रवेश बंदी आहे. फक्त महिलांनीच तिथे जाऊन आपली अंतर्वस्त्रे खरेदी करायची असा नियम आहे. अशा दुकानात महिलेसोबत जाण्यासाठी देखील पुरुषांना परवानगी नाही.

–   लिबियाचा क्रूरकर्मा नेता, मुअम्मर गद्दाफी, हा अतिशय वासनांध होता. त्याने असंख्य बायका भोगल्या. त्याला स्त्रियांच्या पॅन्टीबद्दल अंधश्रद्धा होती. त्यानुसार त्याने सुमारे 20 हजार पॅन्टीजचा संग्रह केला होता. त्याची ही विकृती पराकोटीची म्हटली पाहिजे.