इमरान हाश्मीची रंजक प्रेमकहाणी (Interesting Lov...

इमरान हाश्मीची रंजक प्रेमकहाणी (Interesting Love Story Of Emraan Hashmi)

बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावरील चुंबनसम्राट म्हणून गाजलेल्या इमरान हाश्मीने आपले खासगी जीवन कायमच गुलदस्त्यात ठेवलं आहे. आपली बायको परवीन साहनी आणि मुलगा अयान यांच्यावर तो खूपच प्रेम करतो. त्याचा परवीनशी प्रेमविवाह झाला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
इमरान म्हणजे परफेक्ट पती आणि पिता आहे. त्याची पत्नी परवीन फारच कमी पार्टी किंवा फिल्मी फंक्शनला जाते. त्यामुळे तिच्याबद्दल कोणत्याही बातम्या किंवा गॉसिप ऐकायाला मिळत नाही.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रुपेरी पडद्यावर प्रेमवीर म्हणून इमरान गाजलेला आहे. पण खासगी जीवनात त्याचं नाव  कोणत्याही बाईशी जुळलेलं नाही. त्याचं पाहिलं व शेवटचं प्रेम परवीन वरच होतं. कॉलेज जीवनातच दोघांचे प्रेम जुळले. दोघांनी जवळपास १० वर्षे डेट केलं आणि मग लग्न केलं.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
शिक्षण पूर्ण केल्यानंतर इमारनने बॉलिवूडमध्ये संघर्ष करायला सुरुवात केली. पहिल्या ऑडिशनमध्ये तर त्याला नापास करण्यात आलं होतं. ‘राज’ या चित्रपटात त्याने विक्रम भट्ट सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. नंतर याच भट्टच्या ‘फुटपाथ’ मधून त्याने २००४ साली चित्रपटात नायक म्हणून पदार्पण केलं. मोठं यश मिळवण्यासाठी त्याला सतत ५ वर्षे वाट पाहावी लागली. पण खडतर काळात परवीनने त्याला साथ दिली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
पुढे जहर, मर्डर, आशिक बनाया आपने, अशा यशस्वी चित्रपटांनी इमारनची कारकीर्द बहरली. नंतर त्याचा मुलगा अयान कॅन्सरग्रस्त झाला. पण सतत ५ वर्षे उपचार करून त्याने अयानला रोगमुक्त केले.