अक्षय कुमारची आश्चर्यजनक जिंदगी आणि त्याची प्रे...

अक्षय कुमारची आश्चर्यजनक जिंदगी आणि त्याची प्रेमप्रकरण (Interesting Facts And Love Affairs Of Akshay Kumar)

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशी ‘ हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट यशस्वी झाला अन तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्या जिंदगीबाबत जाणून घेतलं तर आश्चर्य वाटेल. सिनेसृष्टीत येण्यासाठी अक्षयला चांगलाच संघर्ष करावा लागला आहे. पडद्यावर तो ऍक्शन नायक, रोमॅन्टिक प्रियकर आणि विनोदी अभिनेता म्हणून गाजला आहे. तर त्याचे खासगी जीवन आश्चर्य वाटेल असे आहे.
बँकॉक मध्ये अक्षय मार्शल आर्टसचे क्लासेस घेत होता. तेव्हा एका विद्यार्थ्याने त्याला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला त्यासाठी तो मुंबईत आला. अन मॉडेलिंग नंतर सिनेसृष्टीत संघर्ष करत तो उच्च स्थानावर पोहचला.

 अक्षय कुमार सोबत काम केलेली अभिनेत्री आयेशा जुल्का, त्याची चांगली मैत्रीण आहे. बेवारशी तसेच जखमी झालेल्या, आजारी पडलेल्या कुत्र्यांची देखभाल करणारी एक धर्मदाय संस्था ती चालवते. अक्षयने तिची खूप आश्चर्यजनक प्रशंसा  केली आहे. अन तिला सदिच्छा दिल्या आहेत.
‘एन्ड ‘ या आगामी वेब सिरीजमध्ये अक्षयने अतिशय जोखीम घेऊन काम केले आहे. त्याचे स्टंट्स बघण्यासारखे आहेत.
डिस्कव्हरी चॅनल वरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या बेअर ग्रिल्स सोबत काम केलेला साहसी कार्यक्रम अविस्मरणीय आहे. जंगलातील साहस त्याला मनापासून आवडले होते.
‘बच्चन पांडे ‘ या आगामी चित्रपटात अक्षय अगदी वेगळ्या अवतारात दिसणार आहे.

अक्षयची प्रेमप्रकरणे सुरुवातीपासूनच लोकांनी पहिली आहेत. या यादीत पहिली होती मॉडेल व अभिनेत्री पूजा बत्रा तिच्याशी साखरपुडा करून देखील अक्षयने लग्न काही केले नाही. रविना टंडन आणि शिल्पा शेटटी या दोघींशी तो एकाच वेळी डेट  करत होता. पण अक्षय या दिलफेक प्रियकराने भ्रमर वृत्तीने त्यांचा त्याग केला. ‘खिलाडीयों के खिलाडी’ या चित्रपटात काम करत असताना अक्षय आणि रेखा यांच्या रोमान्सच्या खूपच वावडया उठल्या होत्या. पुढे त्याने ट्विंकल  खन्नाशी लग्न केलं. तरी त्याचं मन प्रियांका चोप्रावर बसलं होतंच. ट्विंकलने ते तिथून उडवलं .

अक्षयचा जन्म पंजाबचा. अमृतसर शहरी तो जन्मला. त्याचे वडील हरिओम भाटिया लष्करात अधिकारी होते. त्याची आपली आई अरुणाशी फार जवळीक होती. त्याचं खरं नाव राजीव आहे. त्याचे चाहते त्याला अक्की किंवा खिलाडी कुमार या नावाने ओळखतात.

असं म्हणतात की अक्षयची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांची आहे.
ओ माय गॉड २, रामसेतू, बच्चन पांडे, अतरंगी रे, मिशन सिंड्रेला, गोरखा  हे अक्षय कुमारचे आगामी चित्रपट आहेत. प्रत्येक चित्रपटात तो वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे.