साडी सोडून, अनुपमाने बिकिनी काय घातली, तिच्या फ...
साडी सोडून, अनुपमाने बिकिनी काय घातली, तिच्या फोटोंना मिळाले लाखभर लाइक्स (Instead Of Saree, Anupama Wore A Bikini, Her Photo Received Millions Of Likes)

सध्याच्या घडीला ‘अनुपमा’ ही मालिका बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. त्यामध्ये शीर्षक भूमिका करणारी रुपाली गांगुली लोकांची आवडती झालेली आहे. सोज्वळ भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
पण हल्लीच या सोज्वळ दिसणाऱ्या तारकेनं आपल्या इमेजच्या विरुद्ध जाऊन मोठं धाडस केलं. तिनं बिकिनी घालून फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये रुपाली बिकिनी घालून आपल्या मुलासह पाण्यात पोहताना दिसते आहे. साध्या, सोज्वळ रुपाली गांगुलीचं हे धाडसी रूप लोकांना फारच आवडलं आहे.

विशेष म्हणजे फोटो प्रसिद्ध करताच फक्त २ तासांमध्ये त्याला लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. रुपालीच्या मते, तिचा मुलगा रुद्रांश याच्या वाढदिवसानिमित्त हे फोटो शेअर केले आहेत. तिने तसे लिहिले आहे. ‘हॅपीएस्ट बर्थ डे डिअरेस्ट रुद्रांश’ – असे तिने लिहिले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
‘अनुपमा’ ही मालिका लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये रुपाली चांगली पत्नी, आदर्श सून आणि चांगली आई; अशा सोज्वळ रुपात दिसते. ती लोकांना भारी आवडते. म्हणून सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठ्या संख्येने आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
रुपाली गांगुलीचा जन्म आणि संगोपन कोलकातामध्ये झालं आहे. तिला नृत्याची देखील आवड आहे. ‘सुकन्या’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. नंतर ‘संजीवनी’ मालिकेतून तिने सिमरनची भूमिका केली. त्याने ती जास्त नावारूपास आली आणि आत्ता ‘अनुपमा’ मध्ये चांगली अदाकारी करून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.