लंडनमध्ये खास अंदाजात पार पडले सोनम कपूरचे डोहा...

लंडनमध्ये खास अंदाजात पार पडले सोनम कपूरचे डोहाळे जेवण (Inside Pictures Of Sonam Kapoor’s Baby Shower : From Customised Food Menu To Floral Themed Decor)

स्टाइल दीवा सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या तिच्या गरोदरपणामुळे सतत चर्चेत असते. लवकरच ती आई होणार आहे (mom to be). गरोदरपणाच्या सुरुवातीच्या बातमीपासून ते आतापर्यंत वेळोवेळी सोनमने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकून तिच्या गरोदरपणाची खबरबात दिली आहे आणि आता नुकतेच लंडनमध्ये सोनमच्या डोहाळे जेवणाचा समारंभ (baby shower party in London) पार पडलेला आहे. खास अंदाजात पार पडलेल्या या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनमची बहीण रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे डोहाळे जेवणाच्या समारंभाच्या सजावटीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्यासाठी अगदी आठवणीतला असावा म्हणून बहिण रियाने विशेष मेहनत घेतली होती.

तसेच Leo Kalyan या गायकाने या कार्यक्रमामध्ये सोनमचं सुपरहिट गाणं ‘मसककली मसककली’ गायलं. हे गाणं सोनमने या पार्टीदरम्यान खूप एण्जॉय केलं. या गाण्यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leo Kalyanने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गाणं गाण्याची संधी मिळाल्याने Leo Kalyan देखील खूश आहे. सोनमने या कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. तसेच तिचा लूक यावेळी अगदी उठून दिसत होता. ती संपूर्ण कार्यक्रम अगदी मनसोक्त एण्जॉय करताना दिसली.

जेवणापासून ते अगदी डेकोरेशनपर्यंत सगळं या पार्टीमध्ये अगदी खास होतं. शिवाय कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना तिने खास भेटवस्तू देखील दिली. सोनम गरोदरपणातील सुंदर दिवस एण्जॉय करताना दिसते. सध्या ती पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे.