रिचा चड्ढा आणि अली फजलच्या कॉकटेल पार्टीचे फोटो...

रिचा चड्ढा आणि अली फजलच्या कॉकटेल पार्टीचे फोटो आले समोर (Inside Photos Of Richa Chadha And Ali Fasal’s Cocktail Bash)

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या लग्नाआधीचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या कॉकटेल पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता या जोडप्याच्या कॉकटेल पार्टीचे फोटोही खूप व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्डा यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. या दोघांच्या लग्नाच्या विधींचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोत रिचा आणि अली फुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. दोघेही हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन त्या एकमेकांवर उडवत आहेत.

फोटोंमध्ये अलीने पांढऱ्या रंगाचा चिकन कुर्ता पायजमा घातला आहे. गळ्यात पांढर्‍या रंगाची ओढणी घातली आहे. तर रिचाने गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. तसेच दोघांनी गळयात जांभळ्या रंगाची फुलांची माळ घातली आहे.

इतर फोटोंमध्ये अली आणि रिचा आपल्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत पोज देताना दिसत आहेत.