क्रिकेट मालिका जिंकल्याचा जल्लोष : लाजवाब इंडिय...

क्रिकेट मालिका जिंकल्याचा जल्लोष : लाजवाब इंडिया – सिनेसृष्टीची प्रतिक्रिया (India’s Historical Wins Over Australia : Celebrities Applaud the Performance)

ऑस्ट्रेलियाच्या भूमीत चौथा कसोटी सामना जिंकून क्रिकेट विश्वात इतिहास रचला. भारतीय क्रिकेट संघाने मालिका जिंकली. अन्‌ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. याबद्दल क्रिकेट शौकीन देशभर जल्लोष करीत आहेत. त्यामध्ये फिल्मी सितारे पण सामील झालेत. कपिल देवच्या जीवनावर १९८३ नावाचा जो चित्रपट निघतो आहे, त्यामध्ये कपिलची भूमिका रणवीर सिंह करतो आहे. त्याने टीम इंडियाचे अभिनंदन करीत म्हटले की, ऐतिहासिक विजय! क्या कोशिश की है!! गर्व है!!!

अमिताभ बच्चनने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले – इंडिया या इंडिया!! इंडिया… ठोक दिया ऑस्ट्रेलिया को! लाजवाब जीत… बधाई बधाई बधाई!! अद्‌भूत! लाजवाब इंडिया!!!

शाहरूख खान म्हणतो – आपल्या टीमचा शानदार विजय आहे हा! प्रत्येक बॉल बघण्यासाठी मी जागलो. आता शांतपणे झोपतो अन्‌ विजय अंगी भिनवतो. सर्व खेळाडूंना प्रेम आणि त्यांच्या बळाची प्रशंसा करतो. चक दे इंडिया!

कार्तिक आर्यनने भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यात तो म्हणतो – काय ऐतिहासिक विजय आहे हा! या विजयावर तर चित्रपट बनला पाहिजे.

निर्माता करण जोहरने भारतीय संघाचं अभिनंदन करताना – आपल्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचा एक व्हिडिओ पाठविला. त्यामध्ये काजोल आपला तिरंगा झेंडा फडकविताना दिसत आहे. त्यावर त्याने म्हटलं की, देशाचा आजचा मूड हाच आहे. क्रिकेट संघातील मुलांची शानदार कामगिरी बघून खूप अभिमान वाटतो आहे.

रितेश देशमुख म्हणतो – इंडिया जिंदाबाद… टीम इंडियाचा अभिमान वाटतो. हा मोठा विजय आहे. कर्णधाराचे अभिनंदन!  परिस्थिती नियंत्रणात नव्हती तरी पण तुम्ही लोकांनी स्वतःला झोकून देत विजय मिळविला. ही मालिका अविस्मरणीय आहे. कोणत्याही संकटात आम्ही मजबूत होतो अन्‌ उत्कृष्ट कामगिरी करतो. आम्हाला काहीच अशक्य नाही, आम्ही सगळं काही मिळवू शकतो, हे या विजयाने सिद्ध केलं आहे.

सुनील शेट्टीने विजेत्या संघाचा फोटो शेअर करत म्हटलं की – या ऐतिहासिक विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! क्रिकेटचं भवितव्य चकाकत आहे!

अक्षय कुमारने देखील तोच फोटो देऊन म्हटलं – जबरदस्त कामगिरीबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! संकटांशी सामना देत त्यांनी इतिहास रचला. आपण खरोखरीच चॅम्पियन आहात.