‘इंडियन आयडॉल’ शो आता मराठीत सुरू ह...

‘इंडियन आयडॉल’ शो आता मराठीत सुरू होणार (Indian Idol Marathi Coming Soon On Sony Marathi)

अलिकडेच सोनी वाहिनीवरील इंडियन आयडॉल या हिंदी रिॲलिटी शोच्या १२व्या पर्वाची सांगता झाली. या शोच्या आत्तापर्यंतच्या सर्वच पर्वांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. नेहा कक्कर, अभिजित सावंत, जुबिन नौटियाल यांसारखे अनेक गायक या शोमधून उदयास आले आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना ‘इंडियन आयडॉल – मराठी’ पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सोनी मराठी वाहिनी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच ‘इंडियन आयडॉल – मराठी’ घेऊन येते आहे.

२००४ मध्ये सोनी वाहिनीवर ‘इंडिया आयडॉल’ या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात झाली होती. तेव्हापासून या कार्यक्रमाची सलग १२ पर्वं पार पडली आहेत. नव्या प्रतिभेला संधी देणं आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या मंचाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. अन्‌ आता मराठी गायकांच्या प्रतिभेलाही नवा मंच मिळणार आहे. नुकतीच या शोची एक खास झलक शेअर करण्यात आली आहे, ज्यात ‘इंडियन आयडॉल मराठी’ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे.

Indian Idol Marathi Coming Soon

नुकताच ‘इंडियन आयडॉल १२’चा महाअंतिम सोहळा पार पडला. या पर्वात शेवटच्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व पाच स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या १२व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. एकंदरीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात परिक्षक म्हणून सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी आपला सहभाग नोंदवला. इंडियन आयडॉलच्या विजेत्याला ट्रॉफी व्यतिरिक्त देखील अनेक बऱ्याच गोष्टी मिळतात.

आता हा शो मराठीत प्रसारित होणार आहे. पण अद्याप यात कोण परीक्षक असणार तसेच तो कधीपासून सुरू होणार यासंबंधीची माहिती मिळालेली नाही. परंतु अनेकांनी या शोचे स्वागत केले आहे. या आधी मराठीत ‘सा रे ग म प’, ‘सुर नवा ध्यास नवा’, ‘युवा सिंगर’ असे शो झाले आहेत. अन्‌ आता इंडियन आयडॉल हा शो मराठीत येत आहे.