इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता अभ...

इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता अभिजीत सावंतला करोनाची लागण (Indian Idol 1 Winner Abhijeet Sawant Tests Positive For COVID-19)

‘इंडियन आयडल’ या गाण्याच्या रिॲलिटी शोच्या पहिल्याच पर्वाचा पहिला विजेता अभिजीत सावंत याची करोना चाचणी सकारात्मक आली असल्याचे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सांगितले आहे. त्याने आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे.

अभिजीतने आपल्या तब्येतीबाबत आपल्या चाहत्यांना असं सांगितलं आहे की, ‘दोन दिवसापासून मला ताप येत होता. तब्येत बरी नाही म्हणून मी स्वॅबची चाचणी केली. तेव्हा त्या चाचणीमध्ये मला करोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे कळले. आता मी मला घरीच क्वारंटाईन केले आहे. ‘

आपल्या ट्वीटद्वारे अभिजितने आपल्या चाहत्यांना करोनासंबंधी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याविषयक आग्रहाने सांगितले आहे. मास्कचा वापर करा, स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, असे त्याने म्हटले आहे. अभिजीत आपल्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, आपल्याकडून हा विषाणू दुसऱ्यापर्यंत पसरू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारची सौम्य लक्षणे देखील दिसून आली तरी लगेच चाचणी करून घ्या. सॅनिटायझरचा वापर करा. मागील काही दिवसांपासून आपण बॉलिवूडमधील कलाकारांना करोनाची लागण झाल्याचे ऐकले आहे. तेव्हा आपण स्वतःची काळजी घेणे हाच यावरील उपाय आहे, असे त्याने म्हटले आहे.