रक्तवाहिन्यांच्या आजारावरील उपचारांसाठी वाजवी द...

रक्तवाहिन्यांच्या आजारावरील उपचारांसाठी वाजवी दरात साधने उपलब्ध (Indian Device Now Available To Treat Vascular Diseases)

इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अॅण्ड इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी या संघटनेने अलिकडेच मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील मध्य कालावधी परिषद घेतली. त्यात देशातील शेकडो डॉक्टर्स सहभागी झाले होते. या परिषदेत रक्तवाहिन्यांच्या आजारावर उपचार करण्याबाबत जी काही संशोधने झालीत, त्यावर चर्चा झाली. रुग्णांच्या सुरक्षेत सुधारणा आणि उपचार दर्जात वाढ करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल व त्यावर येणारा खर्च कसा कमी करता येईल, यावर चर्चा झाली.
वरील माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुयश कुलकर्णी यांनी दिली. केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख आणि डॉ. क्रांतीकुमार राठोड यांनी लठ्ठ रुग्णांचे वजन प्रभावशाली पद्धतीने कमी करण्यासाठी एका नव्या स्टेंटचे डिझाइन विकसित केले आहे. त्याला अमेरिकन संघटनेचे पेटंट प्राप्त झाले आहे. त्याच्या आधारे डॉ. विमल सोमेश्वर म्हणाले की, रक्तवाहिन्यांच्या आजारांसाठी भारतात तयार करण्यात आलेली साधने , आता एका वर्षातच वाजवी दरात उपलब्ध होतील. सदर परिषदेचे हे मोठे फलित म्हणता येईल.

आयएसव्हिआयआरचे महासचिव डॉ.अजित यादव यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच या परिषदेत इन्टरव्हेन्शल रेडिओलॉजी उपचार करण्यासाठी मुंबईतील ज्या हॉस्पिटलात तंत्रज्ञ उपचार करतात, त्याशिवाय इतर वैद्यकीय संस्थांमध्ये या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देऊन , उपचारांची कक्षा वाढवण्याचा विचार झाला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मुंदडा यांनी व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारांवर इन्टरव्हेन्शल रेडिओलॉजी कशी प्रभावशाली ठरते, ते स्पष्ट केले. हा रोग मुख्यत: दिवसभर उभे राहून  काम करणाऱ्या पोलिसांमध्ये आढळून येतो. त्यामुळे मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिरात व्हेरिकोज व्हेन्सचा आजार जडलेल्या पोलिसांवर उपचार कऱण्यात आले.

सदर संस्थेचे सहसचिव डॉ.नितीन शेट्टी यांनी कर्करोगांच्या उपचारांमध्येवर दिलेल्या रेडिओलॉजीच्या भूमिकेबाबत चर्चा केली. कर्करोगाच्या उपचारात आर्टेरियल मार्गाने कमोथेरपी देणे हे प्रवाभी तंत्र  असल्याचे सांगून ते म्हणाले की, केमोथेरपी देण्याच्या या पद्धतीमुळे ट्युमर्स प्रवाभीपणे नियंत्रित होतात.