‘इंडिया लॉकडाउन’चे ते भयाण वास्तव प...

‘इंडिया लॉकडाउन’चे ते भयाण वास्तव पुन्हा समोर… सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा (‘India lockdown’ trends on Twitter, internet panics – Find what really happened!)

बॉलीवुड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचे चित्रपट आपल्या जीवनातील वास्तव परखडपणे समोर मांडणारे असतात. मग तो “चांदणी बार” असो किंवा ”पेज ३” या सर्व चित्रपटातील कथा आपल्या जीवनावर आधारित असतात. आता मधुर भंडारकर पुन्हा घेऊन येत आहेत आपण सगळ्यांनीच अनुभवलेल्या एका भयाण वास्तवाची कहाणी म्हणजेच.. ‘इंडिया लॉकडाउन’ हा चित्रपट. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे.

२०२० मार्च मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दूर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. संपूर्ण शहरे बंद होती. आता याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. सध्या ट्विटर आणि सोशल मिडियावर ‘इंडिया लॉकडाउन’ ही सर्वाधिक ट्रेंडला आहे. गतकाळातील घटनांची धास्ती अजूनही मनाभोवती असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल आहे. एवढेच नव्हे तर विनोदी मिम्स देखील बनवले जात आहे.

लॉकडाउनमध्ये आयुष्य पणाला लागलेल्या ४ पात्रांची ही गोष्ट आहे. जे आपल्या संपूर्ण समाजाचं वास्तव मांडतात. शहरांमध्ये काम करणाऱ्या मजूरांची गावी जाताना काय अवस्था झाली ही देखील या चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटात सई एका मजूराच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेता प्रतीक बब्बर तिच्या पतीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा एक फोटो शेयर करत सईने आपला अनुभव सांगितला आहे.

सईने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो तिच्या ‘इंडिया लॉ़कडाऊन’ या चित्रपटाच्या शूटिंगमधला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या हातगाडीवर ती झोपली आहे. तर झोपेतच तिने एका हाताने तिने काळ्या रंगाची छत्री पकडली आहे. तर आजूबाजूला चित्रीकरण सुरू असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत सईने एक कॅप्शन पण दिले आहे. ‘जेव्हा आम्ही चित्रपटाच्या सेटपासून खूप दूरच्या ठिकाणी शूटिंग करत असतो, तेव्हा असं परिस्थितीशी जुळवून घेत काम करतो. हीच जुळवून घेण्याची वृत्ती टाळेबंदीच्या काळामध्ये आपल्या कामी आली’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरचीही बरीच चर्चा आहे. मधुर भांडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सई, प्रतीक यांच्यासह या चित्रपटामध्ये श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या वर्षातील मधुर भांडारकरचा हा दुसरा ओटीटी चित्रपट आहे. ‘इंडिया लॉकडाउन’ 2 डिसेंबर रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)