ट्रोलर्सचे तोंड बंद करण्यासाठी स्वरा भास्कर वाप...

ट्रोलर्सचे तोंड बंद करण्यासाठी स्वरा भास्कर वापरते ही युक्ती (In This Way, Swara Bhaskar Gives a Befitting Reply to The Trolls, Actress use to Try These Methods)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या बेताल वक्तव्यांमुळे इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. पण तिच्या अशा बोलण्यामुळे ती अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते, पण स्वरा ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देखील ओळखली जाते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत स्वराने सांगितले की, तिने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एक खास युक्ती केली आहे.


अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत स्वरा भास्कर म्हणते की, ट्रोलर्सनी मला ज्या प्रकारे कोंडीत पकडलं आहे, त्याची तुलना घरगुती हिंसाचारास बळी पडलेल्या महिलांशी करता येईल, आपला हा मुद्दा अधिक विस्ताराने सांगत ती म्हणते की, कित्येकवेळा मी आतून कोलमडून पडते. त्याचबरोबर तिचं असंही मत आहे की, ही काही चांगली गोष्ट नाही. सहन करताच कामा नये. आपल्याला लढत दिली पाहिजे.


स्वराच्या मते, जे लोक तिला सोशल मीडियावर बरे वाईट सुनावतात. ते लोक एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीने प्रेरित असतात. ती अनेकवेळा असे ट्विट पाहते, ज्यामुळे तिला काहीतरी घडणार आहे याची कल्पना येते. अभिनेत्री म्हणते की मला ट्विटरवरील वादांची पद्धत समजली आहे, मला जेव्हा ट्रोल केले जाते तेव्हा त्यापाठी फक्त कोणतातरी उद्देश सतो.


या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी अनेक आवश्यक पावले उचलल्याचे स्वराने मुलाखतीत सांगितले. त्यासाठी ती एक विशिष्ट थेरपी घेत आहे. स्वराने सांगितले की, ती आता तिला आलेले डायरेक्ट मेसेज पाहत नाही. तसेच ती कमेंटसुद्धा वाचत नाही. काही वैयक्तिक मेसेज ती क्वचितच केव्हातरी उघडते. आपल्या मनातल्या मुद्द्यांवर ती आपल्या थेरपिस्टसोबत नियमित चर्चा करते.


स्वराच्‍या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट चार मैत्रिणींच्या कथेवर आधारित आहे. कंटाळवाण्या आयुष्याकडून मजेशीर आणि साहसी जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या चार मैत्रिणींवर आधारित कथेवर हा चित्रपट आहे. या चित्रपटात स्वरा व्यतिरिक्त मेहर विज, पूजा चोप्रा आणि शिखा तलसानिया देखील दिसणार आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम