‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात कलावं...

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात कलावंत ‘मग’ मधून कॉफी पित नाहीत…मग काय पितात……(In The Show ‘Koffee With Karan’, Celebs Doesn’t Drink Cofee In Cofee Mug)

चित्रपट निर्माता करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’ विषयी सगळ्यांच्याच मनात उत्सुकता असते. प्रत्येकाला हा कार्यक्रम पाहायला आवडतो. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कलाकारांकडून केले जाणारे खुलासे, तसेच करण जोहरची होस्टिंग नेहमीच प्रेक्षकांना आवडते. ‘कॉफी विथ करण’ असे या शोचे नाव आहे. याचा अर्थ करणसोबत कॉफी पिणे. शोमध्ये अनेकदा आलेले पाहुणे हातात कॉफी मग घेऊन दिसतात. पण खरेतर या कॉफी मगमध्ये कॉफीच नसते. कॉफी मगमध्ये काय असते हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

‘कॉफी विथ करण’ हा लोकप्रिय टॉक शो 2004 पासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये, इंडस्ट्रीतील मोठे सेलिब्रिटी येऊन करणसमोर जगाला माहित नसलेल्या रहस्यांची पोलखोल करतात. शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, करीना कपूर खान किंवा आलिया भट्ट यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी या शोमध्ये येऊन आपली काही खास गुपिते उघड केली आहेत. सध्या या शोचा 7 वा सीझन चर्चेत आहे. आज आम्ही तुम्हाला या शोचे एक खास गुपित सांगणार आहोत.

या शोच्या नावाप्रमाणेच इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या हातात तुम्हासा कॉफी मग पाहायला मिळतो. पण प्रत्यक्षाच मात्र त्यात कॉफी नसते. आता शोचे नाव ‘कॉफी विथ करण’ आहे, त्यामुळे त्यांना कॉफीचा मग दाखवणे आवश्यक झाले आहे. पण तिथे उपस्थित असलेले कलाकार त्या कॉफी मगमधून कॉफी न पिता आपली आवडते पेय पितात. कोणी त्या मगमधून पेप्सी पितात तर कोक किंवा आणखी काही.कॉफी मग फक्त शोसाठी वापरतात. त्यात जर एखाद्या कॉफी आवडत असेल तर तो कॉफीसुद्धा पिऊ शकतो.

या शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना गिफ्ट हॅम्पर दिले जातात. त्या भेटवस्तू सुद्धा खूप महागड्या असतात. काही वेळेस त्यात सोन्याचे दागिने, आयपॅड, स्पीकर किंवा आयफोनसारख्या भेटवस्तू असतात. या भेटवस्तूची किंमत 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत असते.

करण जोहर हा शो होस्ट करण्यासाठी करोडो रुपये घेतो. या नव्या सीझनमध्ये करणने त्याच्या फीमध्ये आणखी वाढ केल्याचे म्हटले जाते. या शोची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे येणार्‍या पाहुण्यांची जोडी कधीच पुन्हा परत दिसत नाही. दरवर्षी वेगवेगळ्या जोड्यांमध्ये पाहुणे या शोमध्ये येतात.