२०२३ सालच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत ...

२०२३ सालच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत शाहरुख खानच्या ‘पठाण’ चा अव्वल नंबर; त्याचे आणखी २ चित्रपट यादीत (In The List Of IMDb’s Most Awaited Films, Shahrukh Khan’s ‘Pathan’ Takes Ist Position : His 2 More Films Are Also In The List)

आयएमडीबी या वेबसाईटने चित्रपट, टी.व्ही. आणि सेलिब्रिटीज्‌ संदर्भात २०२३ सालच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांची घोषणा केली. गतसालच्या (२०२२) पेज व्ह्यूजच्या आधारे त्यांनी २० भारतीय चित्रपटांची यादी सादर केली असून त्यामध्ये ११ हिंदी तर ५ तमीळ, ३ तेलुगू आणि १ कानडी चित्रपटांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या यादीत शाहरूख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने पहिला नंबर पटकावला आहे. त्याचबरोबर या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या यादीत शाहरूख अभिनित ‘जवान’ आणि ‘डुंकी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

शाहरूखच्या खालोखाल सलमान खानच्या २ चित्रपटांची वर्णी लागली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर ३’ हे सलमानचे चित्रपट या यादीत आहेत. कमल हसनचा ‘इंडियन २’ व कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ याही चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.

अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट, या यादीत तळाला पोहचला आहे. तर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा पदार्पणाचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट सदर यादीत ९ व्या क्रमांकावर आहे.