सुरभि चंदनाचे लाल गाऊनमध्ये देहप्रदर्शन (In Red...

सुरभि चंदनाचे लाल गाऊनमध्ये देहप्रदर्शन (In Red Thigh High Slit Gown Actress Surbhi Chandna Looks Glamorous, Fans Says ‘Bas…)

‘नागिन ५’ मालिकेची अभिनेत्री सुरभि चंदनाने आपला अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आपलं रुप आणि देहप्रदर्शन करणारी काही छायाचित्रे आणि व्हिडिओज्‌ तिनं सोशल मीडियावर प्रदर्शित करून चाहत्यांना घायाळ केलं आहे. लाल रंगाचा थाय हाय स्लीट घालून तिनं ‘मार डाला’ ही अनुभूती चाहत्यांना दिली आहे.

या महिन्यात येणारा प्रेम दिवस अर्थात्‌ व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय्‌. या दिवसाची ओळख दाखवणारा रंग आहे लाल. त्या रंगाचा भडक ड्रेस घालून प्रेमदिनाची चुणूक सुरभिने दाखविली आहे.

आपल्या मांड्यांचे दर्शन घडविणारा हा स्लीट ड्रेस घालून चाहत्यांना आकर्षित केले आहे. या किलर लूकवाल्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्‌सचा जणू पूर आला आहे. त्यांनी या फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट्‌स दिले आहेत.

नागिन फेम सुरभिची ही अदा विलक्षण मोहक ठरली आहे. मांड्यांचे प्रदर्शन घडविणाऱ्या क्रॉसबॉडी ड्रेसमध्ये सुरभि आपली सडपातळ आणि बांधेसूद काया व्यवस्थित दाखवते आहे.

सुंदर दिसण्याबरोबरच, यो फोटोंमध्ये सुरभिचा कमनीय देह उठून दिसतो आहे. या लालचुटुक ड्रेसवर लेयरवाला नेकपीस आणि ब्लॅक हिल खुलून दिसतो आहे. त्याचप्रमाणे तिचा स्टॉप-ऑन मेकअप चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

आपली स्टाईल दाखवत सुरभिने लिहिले आहे, “आज खिचडी बनवू की पुलाव?” तिच्या या चेष्टेखोर कॅप्शनवर चाहत्यांनी मजेदार कॅप्शन्स लिहून उत्तर दिले आहे. काय पकवायचं, याचा सल्ला तिला दिला आहे.

टेलिव्हिजनची भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिने या फोटोंवर कमेंट करून लिहिलं आहे की, तुझे लूक एकदम किलर आहे. एका युजरने लिहिलं – नागिनमध्ये आम्ही तुम्हाला मिस करतो आहे.

दुसऱ्या एका युजरने कमेंट दिलीय्‌, “तुमचा बॉडीट्रांस कमालीचा आहे.” आणखी एक यूजर लिहितो, “काहीतरी करा अन्‌ नागिनमध्ये परत या.”
किलर लूकवाल्या या कलावतीच्या फोटोंना आतापर्यंत २ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सुरभि चंदना एकता कपूर निर्मित ‘नागिन ५’ या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका करत आहे. सुत्रांकडून असे कळते आहे की, ही मालिका लवकरच बंद होणार असून तिच्या अखेरच्या एपिसोडचे शुटिंग झाले आहे.

प्रेक्षकांनी या मालिकेतील शरद मल्होत्रा आणि सुरभिची ऑन स्क्रीन केमिस्ट्रीला पसंती दर्शविली आहे. एका चाहत्याने कमेंट दिलीय्‌ – ५ रुपये की पेप्सी, हमारी सुरभि दी सबसे सेक्सी.

सुरभिला ‘इश्कबाज’ या टी.व्ही. कार्यक्रमातून प्रेक्षक ओळखू लागले. त्यानंतर ती टी.व्ही विश्वात प्रख्यात झाली. तिनं कॉलेजात असल्यापासून मॉडेलिंग सुरू केले होते.

Photo Credit: Instagram

तिची अभिनय कारकीर्द सब टी.व्ही.च्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेपासून सुरू झाली होती.