रक्षाबंधन पवित्र बंधन (Importance Of Holy Raksh...

रक्षाबंधन पवित्र बंधन (Importance Of Holy Rakshabandhan)

श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच, ‘नारळी पौर्णिमा’. समुद्रकाठी राहणारे कोळी बांधव हा
सण प्रामुख्याने साजरा करतात. या पौर्णिमेस ‘राखी पौर्णिमा’ असंही म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते.
श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच, ‘नारळी पौर्णिमा’. समुद्रकाठी राहणारे कोळी बांधव हा सण प्रामुख्याने साजरा करतात. वर्षा ऋतूत समुद्र खवळलेला असतो आणि सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी हा उत्तम कालावधी असतो. त्यामुळे कोळी बांधव मासेमारीसाठी बोटी समुद्रात घेऊन जात नाहीत. नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो आणि खवळलेला समुद्र शांत होतो. यानंतर कोळी बांधव मासेमारीस सुरुवात करतात. समुद्र शांत व्हावा, त्याचा कोप होऊ नये, जहाजं, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी ते देवाला प्रार्थना करतात. कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ देतात आणि नारळाचे गोड पदार्थ बनवतात.
या पौर्णिमेस ‘राखी पौर्णिमा’ असंही म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या उत्कर्षाविषयी मनोभावे प्रार्थना करते. भाऊदेखील बहिणीला भेटवस्तू देऊन, तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. या सणाविषयी अनेक पारंपरिक कथा प्रचलित आहेत. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून, त्याला आपलं भाऊ केलं आणि नारायणाची सुटका केली. म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते, असं म्हणतात.
तर मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमणांपासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा केला जात होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरुवात झाली, असं म्हणतात.
श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांची रेलचेल. त्यात पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाचा सण म्हणजे, मध्यवर्ती समतोल राखणारा सण. या दिवशी सासरी गेलेली बहीण आपल्या
भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येते. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर नसतो.