आयएमडीबीच्या यंदाच्या टॉप 10 भारतीय स्टार्सच्या...
आयएमडीबीच्या यंदाच्या टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीत साऊथ स्टार्स आघाडीवर, धनुषचा पहिला तर आलियाचा दुसरा क्रमांक! (IMDb Most Popular Indian Stars of 2022 south superstars wins the list)

आयएमडीबीने २०२२च्या टॉप १० भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये हृतिक रोशन, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय बच्चन यांनी स्थान मिळवले आहे परंतु धनुषने सर्वांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले.
२०२२ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या टॉप १० सेलिब्रिटींची यादी IMDb ने जाहीर केली. या यादीत साऊथ सुपरस्टार धनुष अग्रस्थानी आहे. यंदाचे हे वर्ष साऊथ फिल्म इंडस्ट्रीसाठी (south film industry) खूप चांगले वर्ष ठरले आहे. या वर्षी साऊथच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) राज्य करत सर्व पुरस्कार पटकावले. आता IMDb (Internet Movie Database) ने या वर्षातील लोकप्रिय भारतीय स्टार्सची (Indian stars) जी यादी जारी केली आहे, त्यातही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनी आपले स्थान पक्के केले आहे. आलिया भट्ट, ऐश्वर्या रॉय यांसारख्या अभिनेत्रींना मागे टाकत साऊथचा स्टार धनुषने यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
Aaaand we have arrived at the moment we’ve all been waiting for 🥁 Presenting the IMDb Top 10 Most Popular Indian Stars of the year 💛
— IMDb India (@IMDb_in) December 7, 2022
Who was your favourite Indian star this year? 🎬⭐️ #IMDbBestof2022 pic.twitter.com/w6deLsCZ9y
IMDb, ई-कॉमर्स कंपनी Amazon ची शाखा म्हणून काम करणाऱ्या ऑनलाइन रेटिंग वेबसाइटने बुधवारी २०२२ मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची यादी जारी केली. आयएमडीबीचा दावा आहे की, ही यादी दरमहा त्यांच्या वेबसाइटला भेट देणाऱ्या २० कोटी यूझर्सच्या पसंतीनुसार तयार करण्यात आली आहे. या यादीत चित्रपट अभिनेता धनुषचे नाव आघाडीवर आहे. यासाठी ‘द ग्रे मॅन’ आणि ‘तिरुचिथ्रंबलम’ सारख्या चित्रपटांमुळे जागतिक स्तरावर त्याची लोकप्रियता वाढल्याचे सांगण्यात आले. तर गंगूबाई काठियावाडी आणि ब्रह्मास्त्र सारखे दोन मोठे हिट चित्रपट देणाऱ्या आलिया भट्टने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. पीएस-1 मध्ये राणी नंदिनीची भूमिका करणारी माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिने तिसरे स्थान मिळविले आहे.

पहिले स्थान- धनुष
दुसरे स्थान- आलिया भट्ट

तिसरे स्थान- ऐश्वर्या राय बच्चन
चौथे स्थान- राम चरण
पाचवे स्थान- सामंता रुथ प्रभु
सहावे स्थान- ऋतिक रोशन
सातवे स्थान- कियारा आडवाणी
आठवे स्थान- Jr. NTR
नववे स्थान- अल्लू अर्जुन
दहावे स्थान- यश

अशी करण्यात आली स्टार्सची निवड
IMDb च्या टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीमध्ये त्या स्टार्सचा समावेश आहे ज्यांनी या वर्षी IMDb च्या विकली रँकिंगमध्ये सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे. जगभरातील २०० मिलियनहून अधिक आईएमडीबीला व्हिजिट करणाऱ्या लोकांच्या संख्येच्या आधारावर रँकिंग निश्चित करण्यात आली आहे.