समुद्रकिनारी लाल-पांढऱ्या बिकिनीत इलियाना डिक्र...

समुद्रकिनारी लाल-पांढऱ्या बिकिनीत इलियाना डिक्रुजचे उन्मादक अंगप्रदर्शन; मैत्रिणींसोबत मौजमस्ती करतानाचे फोटो पाहून चाहत्यांचे मनोरंजन (Ileana D’Cruz Stuns In A Red And White Bikini As She Holidays With Friends On A Beach, See Photos)

कित्येक दिवस प्रसिद्धीपासून दूर असलेली इलियाना डिक्रुज आता आपले ताजे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून प्रकाशझोतात आली आहे. त्यात समुद्रकिनाऱ्यावर लाल-पांढऱ्या बिकिनीत ती अंगप्रदर्शन करताना दिसते आहे.

‘रुस्तम’ मधून दिसलेली ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये फारशी दिसत नाही. पण सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यानुसार तिने आपले बिकिनीमधील ताजे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

इन्स्टाग्राम वर झळकवलेल्या या छायाचित्रात इलियाना चांगलीच उन्मादक दिसत आहे.

समुद्रकिनारी तिनं हे फोटो काढून घेतले आहेत. त्यात ती मैत्रिणींसह मौजमस्ती करताना दिसते आहे.

दिवाळी खास ढंगात साजरी करत असल्याचं तिनं या फोटोसोबत दिलेल्या मजकुरात म्हटलं आहे.

सोशल मीडियावर इलियानाच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळते आहे.

चाहत्यांचे छान मनोरंजन होत असल्याने, ते या फोटोंवर भरपूर लाइक्स आणि कमेंटस्‌ देत आहेत.

यापूर्वी देखील इलियानाने आपले बिकिनीतले फोटो प्रसिद्ध केलेले आहेत.