आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने स्टेज सोडून केल...

आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने स्टेज सोडून केला प्रेक्षकांमध्ये पत्नीसोबत डान्स.. चाहते बोलले हा तर मिरवणूक डान्स! ..(IIFA 2022: Abhishek Bachchan’s Impromptu Dance With wife Aishwarya And Daughter, Aaradhya, Watch Viral Video)

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आयफा अॅवॉर्डची (IIFA 2022). या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक कलाकार गेले आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या स्टार्सचे लूक आणि त्यांच्या ग्रीन कार्पेट स्टाइलकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात काहींची स्टाइल प्रेक्षकांना आवडली तर काहींच्या मते ती फ्लॉप ठरली. या सगळ्यामध्ये एक मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन डान्स करताना दिसत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत पत्नी ऐश्वर्या (राय बच्चन) आणि मुलगी आराध्या देखील जबरदस्त डान्स करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की,  अभिषेक स्टेज सोडून प्रेक्षकांमध्ये येऊन नाचू लागतो. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही बसून डान्स करून अभिषेकला सपोर्ट करायला सुरुवात करतात.  त्यांचा डान्स पाहून असे वाटते की ते खूप मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत, तर चाहतेही या डान्सची खूप मजा घेत आहेत.

अभिषेकचा  डान्स काही प्रेक्षकांना आवडला मात्र सलमानच्या चाहत्यांनी त्या डान्सला नापसंती दर्शवत , हे सर्व सलमानला जळवण्यासाठी शो ऑफ करत आहेत असे म्हणत आहेत. तर काही जण म्हणतात की, एकदा तुम्ही भाईची गर्लफ्रेंड झालात की पुढे भविष्यात तुम्ही कोणाचीही बायको म्हणून मिरवत असाल तरी लोक तुम्हाला सलमानची एक्स म्हणूनच ओळखणार. मग ती ऐश्वर्या असो किंवा कतरिना.

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अॅवॉर्ड फंक्शनचा डान्स कमी आणि मिरवणुकीतला डान्स जास्त वाटत असल्याचंही काही चाहत्यांनी म्हटलंय… हे झालं डान्सबद्दल पण चाहत्यांनी अॅशच्या लूकलाही खूप ट्रोल केले. सोहळ्याला अभिषेक आणि ऐश्वर्या हातात हात घालून पोज देत होते, ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहून ऐश्वर्याला झाले तरी काय ? दिवसेंदिवस तिचा ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइल इतकी का खराब होत आहे. तिचा मेकअपही नेहमी सेम आणि बोअरिंग असतो, असे चाहते म्हणत आहेत. 

कार्यक्रमासाठी अॅशने काळ्या रंगाचा गाऊन निवडला, ज्यावर तिने फ्रंट ओपन लाँग जॅकेट घातले होते. हे जॅकेट खूप भडक होते, त्यात मोठी एम्ब्रॉयडरी डिझाइन होती. या कपड्यांवरही अॅशने नेहमीप्रमाणे तिच लाल लिपस्टिक आणि तिच हेअरस्टाईल केली होती.