‘आम्हाला मुलगा असता तर तो शाहरूख सारखा दि...

‘आम्हाला मुलगा असता तर तो शाहरूख सारखा दिसला असता’ – सायरा बानूने उलगडले शाहरूखचे, दिलीपकुमारशी असलेले भावबंध (‘If We Had A Son, He Would Have Looked Liked Shahrukh’ – Saira Banu Reveals Similarity Between Shahrukh And Dilip Kumar)

शोकनायक दिलीपकुमार यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सिनेसृष्टीतील मातब्बर नेते गेले होते. शाहरूख खान देखील त्यापैकी एक होता. शाहरूख खान आपला लाडका आहे, असं सायरा बानूने फार पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

दिलीपकुमारचे शाहरूख खानशी भावबंध जुळले होते, असं सांगत या दोघांमध्ये पुष्कळ साम्य आहे, असं सायराने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. दिलीपकुमारने व सायरा बानू यांनी शाहरूखला एवढा लळा लावला होता की, ”आम्हाला मुलगा झाला असता तर तो शाहरूख सारखा दिसला असता,” असंही सायराने त्या मुलाखतीत सांगितलं होतं.

शाहरूख आणि दिलीपकुमार यांच्यात खूप साम्य आहे. त्याचे केस दिलीपसाहेबांसारखे आहेत, असं तिचं मत होतं. शाहरूख आणि दिलीप साहेब हे दोघेही ‘खान’ असल्याने त्यांच्यात ही जवळीक निर्माण झाली असावी. शाहरूखचे त्यांच्याकडे जाणेयेणे होते. हॉस्पिटलात असताना शाहरूख त्यांना भेटून गेलेला आहे.

हेमा मालिनीने दिग्दर्शित केलेल्या ‘दिल आशना है’ या चित्रपटाचा मुहूर्त दिलीपकुमाच्या हस्ते करण्यात आला होता. त्यात शाहरूख होता. त्या मुहूर्त प्रसंगी त्याची दिलीप – सायरा यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. अन्‌ पुढे त्यांचे भावबंध जुळले.

मधुबाला आण दिलीपकुमार यांच्या ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातील एक पूर्ण आकाराचे छायाचित्र शाहरूखने मिळवले. त्यावर दिलीपकुमारची सही घेतली व ते छायाचित्र त्याने आपल्या घरातील खासगी थिएटरात लावले आहे.