मला काही झाल्यास त्याला नाना पाटेकर जबाबदार असत...

मला काही झाल्यास त्याला नाना पाटेकर जबाबदार असतील असे म्हणत तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा साधला नाना पाटेकरांवर निशाणा (‘If anything happens to me, Nana Patekar and Bollywood Mafia will be responsible’- Tanushree Dutta slams bollywood)

2018 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर लैंगिक छऴ केल्याचा आरोप केला होता. त्यासाठी तिने मी टू चळवळ सुरु केली होती. तनुश्रीने आता पुन्हा एकदा नानांवर निशाणा साधला आहे. तनुश्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, मला काही झाले तर त्यासाठी नाना पाटेकर आणि त्याचे बॉलिवूड माफिया कारणीभूत असतील. तनुश्रीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला आहे.

तनुश्रीने आज सकाळीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफियांनी तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तनुश्रीने एक फोटो शेअर करत सोबतच एक लांबलचक पोस्ट लिहून त्यात स्वत:चे दु:ख मांडले आहे. तिने लिहिले, मला कधी काही झाले तर त्यासाठी #metoo आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि बॉलिवूड माफिया जबाबदार असतील. कोण आहे बॉलिवूड माफिया? हे तेच लोक आहेत ज्यांचे सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सातत्याने नाव समोर येत होते. त्या लोकांकडे त्यांचा वकीलसुद्धा आहे.

तनुश्रीने तिच्या पोस्टमधून लोकांना बॉलिवूड बायकॉट करण्याचे आवाहन केले आहे. तिने पुढे लिहिले की, “त्यांचे चित्रपट पाहू नका. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका, त्यांच्या पाठी लागा. ज्यांनी माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या लिहिल्या, माझ्या विरोधात प्रचार केला अशा मीडियाचे पत्रकार आणि पीआरच्या पाठी लागा. त्यांचे जीवन नरक बनवा. त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. कायदा आणि न्यायव्यवस्थेने जरी मला चुकीचे ठरवले असले तरी मला माझ्या देशातील नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे…जय हिंद ! पुन्हा भेटू…”

असंच काही दिवसांपूर्वी तनुश्रीने पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने माझा खूप छळ होत असून माझ्यावर उगीच निशाणा साधला जात आहे. कृपया कोणीतरी काहीतरी करा. माझ्या कामवालीकडून, माझ्या खाण्यापिण्यात स्टिरॉइड्स मिसळले गेले, त्यामुळे मला आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मे महिन्यात मी उज्जैनला गेले होते तेव्हा दोनदा माझ्या गाडीच्या ब्रेकसोबत छेडछाड करून दोनदा माझा अपघात घडविण्याचा प्रयत्न केला होतो. बॉलीवूड माफियांनी माझे करीअर उद्ध्वस्त केले. मला आत्महत्येसाठी चिथावणी देण्यात आली. परंतु मी असे काही करणार नाही किंवा इंडस्ट्रीही सोडणार नाही.

तनुश्री बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण 2018 मध्ये तिने #MeToo चळवळीअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करून लोकांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर ती अचानक चर्चेत आली.