किशोर कुमार यांचा बंगला विकला गेलाय् : क्रिकेटप...

किशोर कुमार यांचा बंगला विकला गेलाय् : क्रिकेटपटू विराट कोहली त्या जागी बांधतोय् हॉटेल (Iconic Bungalow Of Kishore Kumar Is Sold : Cricketer Virat Kohli Is Converting It Into Hotel)

सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार यांचा मुंबईतील जुहू परिसरात असलेला ‘गौरी कुंज’ हा बंगला सिनेशोकिनांचे प्रेक्षणीय स्थळ होते. किशोरदा यांनी तिथे अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या पश्चात अमित-सुमित ही मुले व पत्नी लीना चंदावरकर तिथे राहत होते. परंतु आता हा बंगला विकला गेल्याची खबर आहे. त्या संबंधीचा व्हिडिओ व्हॉट्‌स ॲपवर प्रसारित होतो आहे.

या व्हिडिओत मनीष पॉल नावाचा सूत्रधार बंगल्याच्या परिसरात हिंडून ही माहिती देतो आहे. त्यात तो क्रिकेटपटू विराट कोहलीला भेटतो. अन्‌ हा बंगला आपण घेतला असून तिथे ‘वन एट कम्युन’ (‘One8 Commune’ )नावाचे हॉटले बांधत असल्याची माहिती तो स्वतः देतो आहे.

आपण किशोर कुमार यांचे निस्सीम चाहते असल्याची कबुली विराट या व्हिडिओत देतो आहे. बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांची मालमत्ता विकले जाण्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. फार वर्षांपूर्वी चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओचा काही भाग विकण्यात आला होता. अलिकडेच राज कपूर यांच्या मालकीचा चेंबूर येथील आर. के. स्टुडिओ विकला गेला आहे.