‘’तुझ्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी किबोर्डवर ...

‘’तुझ्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी किबोर्डवर पुरेसे शब्द असते तर….’’, चाहत्यांनी केले श्वेता तिवारीच्या सौंदर्याचे कौतुक (‘I Wish The Keyboard Had Enough Letters To Describe Your Hotness…’ Says Fans As Shweta Tiwari Stuns In Purple Co-Ord Set… Fans Heart It)

श्वेता तिवारीचे नाव घेताच मनात हॉट, फिट, सुंदर असे शब्द आपसूकच येतात. श्वेताला पाहून तिला एक मुलगी आहे असा कोणाचाच विश्वास बसत नाही. चाहत्यांना श्वेता अजूनही 21 वर्षांची तरुणी वाटते.

श्वेताचे फोटोशूट तुफान व्हायरल होतात. अलीकडेच, तिने जांभळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये फोटोशूट केले होते. ते चाहत्यांना खूप आवडले. त्यात श्वेताने वन शोल्डर टॉप आणि लूज पॅन्ट घातली होती. ते कपडे तिला खूप शोभून दिसत होते. फोटोत तिने केस मोकळे सोडले होते. गळ्यात डायमंड नेकलेस घातला होता. एकंदरीत तिचा लूक साधा, पण अतिशय सुंदर आणि मनमोहक होता.

फोटोत श्वेताने जास्त हॉट कपडे घातले नव्हते शिवाय अंगप्रदर्शनही केले नव्हते. पण असे असूनही श्वेताचा हॉटनेस चाहत्यांना भुरळ घालत आहे. एकाने कमेंट केली की काश तुमच्या हॉटनेसचे वर्णन करण्यासाठी कीबोर्डमध्ये पुरेसे शब्द असते… अभिनेता करणवीर बोहराने खूप सुंदर असे लिहिले.

तर दुसरीकडे चाहते श्वेताला फिट राहण्यासाठीच्या टीप्स विचारत आहेत. एकाने लिहिले की तू 21 वर्षांची दिसतेस, कोण म्हणेल पलक तुझी मुलगी आहे. आणखी एका युजरने लिहिले – तुझ्या माजी पतीलाही तुझ्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल पश्चात्ताप होईल आणि दोषी वाटेल. तू खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहेस…तुझी मुलगी देखील आता प्रसिद्ध झाली आहे…

एकाने कमेंट केली- मॅम तुम्ही काय करता… तुमचा कोणाला किंवा सगळ्यांना मारण्याचा हेतू आहे का?. काही चाहते पर्पल हार्ट इमोजी आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत, तर कोणी कॉलेज गर्ल वाटतेस असे म्हणत आहेत.

 श्वेता सध्या मैं हूं अपराजिता या मालिकेत दिसत आहे, तिथेही ती मुलींच्या सिंगल मदरची भूमिका साकारत आहे.